आमदार सुहास कांदेंनी एकनाथ शिंदेंसाठी केला होता नवस

शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे बुधवारी ( ता. 6 ) शिर्डीत आले होते.
Suhas Kande News, Nashik News, Shivsena News
Suhas Kande News, Nashik News, Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - राज्यातील शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता बदल झाला तसेच शिवसेनेतही दुही माजली आहे. अशा स्थितीत शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे बुधवारी ( ता. 6 ) शिर्डीत आले होते. ( MLA Suhas Kande had made a vow for Eknath Shinde )

शिवसेना आमची अन् आम्ही शिवसेनेचे, असा नारा देत वेगळी चूल मांडून सत्तेत यायचे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळीत संभ्रम कायम ठेवायचा, त्याच वेळी त्यांच्या भोवतालच्या कोंड्याळ्याला आणि निधीवाटपाच्या भेदभावावरून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करायचे, अशी खेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट करीत आहे. त्यादृष्टीने या गटाचे सर्व आमदार आणि प्रवक्ते आमदार दीपक केसरकर सर्वत्र एकसमान भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचे नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या बुधवारच्या (ता. सहा) शिर्डी भेटीत त्याचा प्रत्यय आला.

Suhas Kande News, Nashik News, Shivsena News
बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर!

यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व काही आलबेल असतानाच्या काळात कांदे यांनी एका बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निधीवाटपाच्या भेदभावावरून जाहीरपणे जोरदार शाब्दिक हल्ला चढविला होता. त्यावेळी या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदारांत सार्वत्रिक खदखद आहे. त्यावरून वेगळी भूमिका घेण्यासाठीचे मैदान तयार केले जात आहे, याची चाहूल कुणालाही लागली नाही. कालच्या शिर्डी भेटीत कांदे यांनी हा मुद्दा पुन्हा माध्यमांसमोर ठळकपणे मांडला.

शिर्डीत येण्याचे प्रयोजन विचारले असता त्यांनी सांगितले की, गुवाहाटीत असताना आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असा साईबाबांना नवस केला होता. आज नवसपूर्तीसाठी साईंचे सपत्नीक दर्शन घेतले. मला मंत्रिपद मिळाले तर आनंदच, नाही मिळाले तरी हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Suhas Kande News, Nashik News, Shivsena News
सुहास कांदे एकटे पडले, कार्यकर्ते शिवसेनेसोबतच!

कांदे म्हणाले, की आमच्यात विकासकामांवरून खदखद होती. खासदार संजय राऊत यांच्यावरून नव्हती. आमच्या चाळीस मतांवर ते खासदार झाले अन् आम्हाला रेडा आणि डुक्कर म्हणाले. ते ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत, अशा शब्दांत त्यांनी राऊतांनादेखील टोला लगावला.

मातोश्रीवरून फोन आला तर जाल का, असे विचारले असता ते म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व जण जाऊ, एकटे जाणार नाही. असे बोलावणे यावे, असे मलाही वाटते. असे सांगत ठाकरे यांच्याबाबत आमची काहीही तक्रार नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com