Crime News : माहिती अधिकारात माहिती मागवायला गेलेला मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह अभिजित पाटील यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला अधिकाऱ्यांने याबाबतची तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
महिला अधिकाऱ्याने दिलेली तक्रारीत म्हटले आहे की, तीन डिसेंबर रोजी प्रसाद पाटील, अभिजित पाटील यांच्यासह अन्य दोन साथीदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात येऊन महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. माहिती अधिकार अंतर्गत मागविलेली माहीती दिली असताना देखील ती दिली नाही. असे म्हणून वाद घातला.
माहिती देण्यास 30 दिवसांचा कालावधी असताना ती आत्ताच दे असे म्हणून एकेरी बोलणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फोनवरून तू मॅडमचा भक्त झाला आहे. त्या छम**चे काय ऐकशील, असे महिला अधिकाऱ्याबाबत अपशब्द वापरले तसेच वेळोवेळी कार्यालयामध्ये येवून महिला अधिकाऱ्यांवर दबाव आणला, असे देखील तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, माहिती दिलेली असताना देखील दिलेली नाही असे सांगून कार्यालायमध्ये धिंगाणा घालणे, अपशब्द वापरून मोठ्याने बोलणे, शासकीय वेळ संपल्यानंतर सुद्धा रात्री उशिरापर्यंत थांबून माहिती देणेस भाग पाडणे, महिला अधिकारी यांना लज्जा उत्पन्न होइल अशा वाईट नजरेने बघणे, असभ्य भाषा वापरणे, अधिकारी कर्मचारी क्षेत्रीय कामावर असताना त्यांना ताबडतोब बोलावण्यात यावे असा आग्रह धरणे, निवेदनामध्ये, कार्यालयामध्ये महिला अधिकाऱ्यांना उद्देशून माल असा लज्जा उत्पन्न होइल असा शब्द आरोपींकडून वापरला जात होता.
आरोपीने तुम्ही महिला अधिकारी आहात म्हणून वाचल्या, पुरूष असता तर त्याला कपडे फाडून बाहेर नेऊन मारला असता अशा प्रकारे अपशब्द वापरले. तसेच शासकीय कामात अडथळा आणून महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होइल, असे अपशब्द वापरले. शिवीगाळी करून एकेरी भाषेत उद्धट बोलून शाखा अभियंता यांचे अंगावर धावून गेले. असे तक्रारीत म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.