मोदींनी उचललाय काँग्रेस संपविण्याचा विडा... पृथ्वीराज चव्हाण

नोटबंदी Denomination, जीएसटी GST, कृषी कायदे Agriculture Lows यांसारख्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था Economy कोलमडली आहे. देशावर जास्त कर्ज Loan असल्याने नव्याने कर्ज मिळणार नाही.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

शिरवडे : काँग्रेस संपविण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे. देशात सुधारणा करण्याऐवजी सुरू असलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. भाजपला लोकशाही, संविधान मान्य नाही. स्वतः पुढे न येता जातीयवाद, दंगल घडवण्याचे काम सुरू आहे. नोटबंदी, जीएसटी, कृषी कायदे यांसारख्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. रिझर्व्ह बँक तातडीने करवाढीचा निर्णय घेत आहे. त्यामुळे देश आर्थिक संकटात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.

नडशी (ता. कराड) येथे तीन कोटी ६३ लाखांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन, भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, आनंदराव थोरात, शिवराज मोरे, डॉ. सुरेश जाधव, भानुदास माळी, मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, अजितराव पाटील, निलम येडगे, विद्याताई थोरवडे आदी उपस्थित होते.

Prithviraj Chavan
राष्ट्रवादीची सत्ता येताच सोनेरी टोळी पुन्हा सक्रीय : भाजपच्या पृथ्वीराज पवारांचा हल्लाबोल

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘मोदी सरकारने काय दिवे लावले हे आपण पाहात आहात. देशात सुधारणा करण्याऐवजी सुरू असलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. भाजपला लोकशाही, संविधान मान्य नाही. स्वतः पुढे न येता ते जातीयवाद, दंगल घडवत आहेत. नोटबंदी, जीएसटी, कृषी कायदे यांसारख्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशावर जास्त कर्ज असल्याने नव्याने कर्ज मिळणार नाही. रोजगार संपत चालला आहे. रिझर्व्ह बँक तातडीने करवाढीचा निर्णय घेते म्हणजे देश आर्थिक संकटात आहे, असा त्याचा अर्थ आहे.

Prithviraj Chavan
Video: पंतप्रधान मोदींनी लुटला जर्मनीत ढोल वादनाचा आनंद

निवासराव थोरात यांनी काँग्रेस पक्षाकडून २०१७ रोजी आमदार पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यातून समाजकार्य करता आले असून, यापुढेही पक्षासाठी कार्यरत राहीन, असे आश्वासन दिले. अमित जाधव यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com