Solapur VidhanSabha Survey : सोलापुरात भाजपला पाच, तर राष्ट्रवादीला तीन जागा; शहाजीबापूंची दांडी गुल होणार, सोपलांना पुन्हा लॉटरी

जिल्ह्यात राष्ट्रवादीला तीन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, काँग्रेस एक आणि शेतकरी कामगार पक्ष सांगोल्यात पुन्हा जिंकणार, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे
Solapur Assembly Election Servey
Solapur Assembly Election ServeySarkarnama
Published on
Updated on

News Arena India Survey : ‘न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तर भाजपला सर्वाधिक सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. राज्याच्या सर्वच विभागात भाजपला जनमत मिळाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सोलापुरातही भाजप पाच जागा जिंकेल, असा हा सर्व्हे सांगतो. (BJP will get five seats and NCP three seats in assembly elections at Solapur)

सोलापूर जिल्ह्यात (Solapur) राष्ट्रवादीला (NCP) तीन, शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, काँग्रेस (Congress) एक आणि शेतकरी कामगार पक्ष (PWP) सांगोल्यात पुन्हा जिंकणार, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे काय झाडी, काय डोंगार फेम सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे ‘डेंजर झोन’मध्ये आले आहेत.

Solapur Assembly Election Servey
Mumbai VidhanSabha Survey: मुंबईकरांचा भाजपला कौल, ठाकरेंनाही साथ; शिंदे गट मात्र पिछाडीवर…

‘न्यूज एरेना डंडिया या संस्थेच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर भाजपला (BJP) आत्तापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे १२३ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १९ जागा, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटापेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. त्यांना २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

Solapur Assembly Election Servey
News Arena India Survey : फडणवीसांचे 'खास' अभिमन्यू पवारांसह शिंदे गटाचे भुमरे आणि बांगर अडचणीत...

सोलापूर जिल्ह्यात भाजप सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर आणि माळशिरस या पाच जिंकेल, असा अंदाज या सर्व्हेचा आहे. सध्या या पाचही जागा भाजपकडेच आहेत, त्यामुळे भाजप आपल्या जागा राखेल, असे यात नमूद करण्यात आलेले आहे. सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख, माळशिरसमधून भाजप जिंकेल. मात्र, या ठिकाणी भाजप कोणाला संधी देतो, हे पाहावे लागणार आहे. कारण विद्यमान आमदार राम सातपुते यांचे नाव भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी विचाराधीन आहे, त्यामुळे माळशिरसमधून नवा आमदार येतो, की सातपुते यांनाच पुन्हा भाजप लढवणार, हे काळच सांगेल.

पंढरपुरातही विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या रस्सीखेच असेल, तिकिटात बाजी मारणार उमेदवार जिंकेल, असेही या सर्व्हेत नमूद करण्यात आलेले आहे.

Solapur Assembly Election Servey
Sahakar Shiromani Result: कल्याणराव काळेंनी २२ वर्षांची सत्ता राखली; मात्र पाटलांना मिळालेले मते चिंतन करायला लावणारी

सोपलांना पुन्हा लॉटरी लागणार

सध्या कोरी पाटी असलेल्या शिवसेनेला (उबाठा) एका जागेचा फायदा होताना दिसत आहे. बार्शीची जागा ही शिवसेनेला दाखविण्यात आलेली आहे. खरं या ठिकाणी भाजप समर्थक राजेंद्र राऊत हे आमदार आहेत. मात्र, आता निवडणुका झाल्या तर शिवसेना जिंकेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. शिवसेनेकडून सध्या माजी मंत्री दिलीप सोपल हे प्रमुख दावेदार आहेत.

शहाजीबापू डेंजर झोनमध्ये

दुसरीकडे शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे ‘डेंजर झोन’मध्ये आले आहेत. मागच्या निवडणुकीत ते अवघ्या ७६८ मतांनी जिंकले होते. या मतदारसंघात पुन्हा एकदा (स्व.) गणपतराव देशमुख यांची जादू चालण्याचा अंदाज असून त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडणूक जिंकतील, अशी शक्यता हा सर्व्हे वर्तवितो. त्यामुळे शहाजीबापूंची दांडी गुल होण्याची शक्यता आहे.

Solapur Assembly Election Servey
Maharashtra Assembly Survey : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच ‘दादा’; पण इंदापूरची जागा धोक्यात...

प्रणिती शिंदे पुन्हा जागा राखणार

एकेककाळी सोलापूर जिल्हा बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसची अवस्था पुन्हा एकदा बिकट दाखविण्यात आलेली आहे. या ठिकाणी काँग्रेस सोलापूर शहर मध्ये ही एकमेव जागा जिंकेल, असा हा सर्व्हे सांगतो. येथून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे शिंदे गटाने या ठिकाणी टाकलेला डाव यशस्वी होण्याची शक्यता कमीच वाटते.

Solapur Assembly Election Servey
News Arena India Survey : भाजपला सर्वाधिक जागा; मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ३५ टक्के जनतेची पसंती

राष्ट्रवादी ताकद कायम राखणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोहोळ, माढा आणि करमाळा या तीन जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यात मोहोळ आणि माढ्यात राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले यशवंत माने आणि बबनराव शिंदे हे आमदार आहेत, तर करमाळ्यात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर संजय शिंदे हे आमदार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी पुन्हा बाजी मारेल, मात्र उमेदवार कोण असतील हेही महत्वाचे ठरणार आहे. मोहोळमध्ये राजन पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत, त्यानंतरही ही जागा राष्ट्रवादी जिंकेल, असा हा सर्व्हे सांगतो.

Solapur- BJP : 5, SSUBT : 1, NCP : 3, INC : 1, OTH : 1

244. Karmala : NCP

245. Madha : NCP

246. Barshi : SSUBT

247. Mohol (SC) : NCP

248. Solapur City North : BJP

249. Solapur City South : INC

250. Akkalkot : BJP

251. Solapur South : BJP

252. Pandharpur : BJP

253. Sangola : PWPI

254. Malshiras (SC) : BJP

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com