Mohite Patil Vs Raut : मोहिते पाटलांनी माझ्या वाट्याला जाऊ नये; मी अकलूजमध्ये सभा घेणारच : राजेंद्र राऊतांनी पुन्हा ललकारले

Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत ५०० हून अधिक मतांनी विजय मिळेल, असा विश्वास राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
Rajendra Raut- Dhairyasheel Mohite Patil
Rajendra Raut- Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 June : विधान परिषदेच्या निवडणुकीत 500 हुन अधिक मतांनी निवडून येणार असल्याचा दावा राजेंद्र राऊत यांनी केला आहे. सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं आहे. लोकसभेतील सदस्य अशा पद्धतीने चुकीचं बोलत असतील तर त्यांचा किती अभ्यास आहे, याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव न घेता राजेंद्र राऊत यांनी लगावला.

चुकीच्या कॉन्फिडन्समुळे धैर्यशील मोहिते पाटलांची ही अवस्था झाली आहे. मतदार केंद्रावर जे गॉगल विरोधकांना सापडले आहेत, ते चोर बाजारातून आणले असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

विधान परिषद निवडणुकीत मोहिते-पाटील यांचे उमेदवार तीन अंकी आकडाही पार करू शकणार नाहीत. निवडून आल्यानंतर अकलूज येथे मी विजयी सभा घेणार आहे. कारण माळशिरस तालुक्यातील मतदारांनीही मला मतदान केले आहे.

माळशिरस तालुक्यातील कुठलीही गुंडगिरी, दहशत, पतसंस्था डीसीसी घोटाळा तपासावा लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी जनतेची पैसे बुडवले आहेत, त्यांनी मला भेटावं. मी पैसे बुडवणाऱ्याचा बोर्डच लावतो, अशा शब्दांत मोहिते-पाटील यांना राजेंद्र राऊत यांनी ओपन चॅलेंज दिले आहे

Rajendra Raut- Dhairyasheel Mohite Patil
Vidhan Parishad Election : मोहिते पाटील प्रचंड आशावादी : म्हणाले ‘अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी; वसंतनाना 100 टक्के जिंकणार’

बार्शी तालुक्यातील माझं काम पाहून विरोधातल्या 21 पैकी 16 नगरसेवकांनी मला मतदान केलं आहे, असा दावाही राजेंद्र राऊत यांनी केला आहे. उत्तम जानकर आणि राम सातपुते संघर्षावर राजेंद्र राऊत म्हणाले, त्यांच्याबरोबर मी समन्वयाच्या भूमिकेत राहणार आहे. उत्तम जानकर आणि राम सातपुते माझे मित्र आहेत दोघांमध्ये समन्वय घडवून आणणार आहे.

आमदार दिलीप सोपल आणि माझा बांधाला बांध नाही. त्यांच्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, त्याला माझा विरोध होता. मात्र पुढच्या दहा पिढ्यातरी सोपल आणि राऊत अशी लढत असणार आहे, असे राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.

Rajendra Raut- Dhairyasheel Mohite Patil
Solapur MLC Voting : सोलापुरात विधान परिषदेसाठी 99. 68 टक्के मतदान : भाजपच्या दोघांचे मतदान झाले नाही; ते दोघे कोण?

मोहिते पाटील यांच्या हर हर महादेव स्टेटसबाबत राजेंद्र राऊत म्हणाले, राऊत कुटुंबीयांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सरदार होते. पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा राऊतांनी योगदान दिलं आहे. इतिहासाची पाने चाळली तर मोहिते-पाटलांना फार झोंबणार आहे. मोहिते-पाटलांनी माझ्या वाटेला जाऊ नये. हर हर महादेव हे फक्त छत्रपतींच्या मावळ्याला शोभतं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com