Ramesh Kadam News : जेलमधून बाहेर आलेले माजी आमदार रमेश कदमांना ठाकरे गटाकडून ऑफर; मोहोळ विधानसभेसाठी...

Mohol Assembly constituency : कदमांना तिकीट देऊन मोहोळ मतदारसंघातून निवडून आणू,"
Ramesh Kadam News
Ramesh Kadam News Sarkarnama
Published on
Updated on

Solapur : जेलमधून जामिनावर बाहेर आलेले माजी आमदार रमेश कदम यांना आगामी विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून ऑफर देण्यात येत आहेत. मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गट, अजित पवार गट आणि मनसेकडून कदमांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून रमेश कदमांना ऑफर देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सोमवारी कदमांची भेट घेतली.

"आज रमेश कदम यांची भेट घेतली असून, आमची राजकीय विषयावर चर्चा झाली. त्यांना शिवसेनेतर्फे आम्ही आमंत्रण दिलं आहे. जर रमेश कदमांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर मोहोळ मतदारसंघात महाविकास आघाडीसोबत चर्चा करून ही जागा शिवसेनेला सोडवून घेणार आहोत. कदमांना तिकीट देऊन मोहोळ मतदारसंघातून कमीत कमी चाळीस हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आणू," असा विश्वास कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Ramesh Kadam News
Raj Thackeray News : मोठी बातमी : राज ठाकरे रान पेटविणार; महाराष्ट्र्भर एकटे लढणार, आघाडी-महायुतीला आव्हान

मोहोळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता तो राहिलेला नाही. मोहोळ मतदारसंघावर आता शिवसेनेचा हक्क आणि अधिकार आहे. रमेश कदमांनी जर घोटाळा केला असता तर आठ वर्षे सरकार झोपलं होते का ? एवढ्या दिवसांत त्यांना त्यांच्यावरील आरोप सिद्ध का करता आले नाहीत? असा सवाल कोळी यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंशी व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कदमांना शिवसेनेत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.

शरद कोळी म्हणाले, "आजपर्यंत कदमांच्या घोटाळ्यावर कुठलाही शिक्कामोर्तब झालेला नाही, याचाच अर्थ त्यांनी घोटाळा केलेला नाही. म्हणून कोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व घोटाळेबाज हे सध्या भाजपमध्ये आहेत. भाजप त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची नासधूस करीत आहेत."

" महाविकास आघाडीमध्ये जर शिवसेनेला (ठाकरे गट) मोहोळ मतदारसंघ सुटत असेल, तर बिनशर्त ठाकरे गटासोबत येण्यास कदमांची तयारी आहे," असे कोळींनी सांगितले. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या घोटाळाप्रकरणी कदम हे आठ वर्षांपासून जेलमध्ये होते. सत्र न्यायालयाने नुकताच त्यांना जामीन दिला आहे. त्यानंतर ते मोहोळमध्ये आले आहेत.

Ramesh Kadam News
Nitesh Rane News : मराठ्यांचे नेते व्हा! टीका करीत बसू नका; राणेंचा जरांगे पाटलांना मैत्रीचा सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com