Phaltan : फलटणच्या कत्तलखान्यातून अतिरेक्यांना अर्थ पुरवठा... मिलिंद एकबोटे

फलटण तालुक्यात Phaltan हिंदू धर्माच्या Hinduism श्रद्धेची अवहेलना केली जात आहे. फलटण नगरी ऐतिहासिक असून येथे रामाचे प्रसिद्ध मंदिर famous temple of Rama असून जैन धर्मियांचे सुद्धा पवित्र तीर्थस्थळ आहे.
Milind Ekbote
Milind Ekbotesarkarnama
Published on
Updated on

सातारा : फलटण मधील बेकायदेशीर कत्तलखान्यांतून गोमांस निर्यातीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आखातात दिले जातात. तोच पैसा एका मशिदीच्या बँक अकाउंट वर जमा होऊन ती रक्कम भारतात अतिरेकी संघटनांना पुरवली जाते. यासंदर्भात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची उच्चस्तरीय चौकशी सुद्धा झाली होती. त्यामुळे या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी गोसेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.

सातारा शासकिय विश्रामगृहात श्री. एकबोटी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रतापगड उत्सव समितीचे संजीव शहा, संजय भोसले, आबासाहेब सापते आदी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले, दरवर्षी भारतात पाच कोटी खिलारी गायांची कत्तल केली जाते. हे गोमांस चोरट्या पद्धतीने चीनला विकले जाते. त्यामधून काही औषधी तत्व तसेच हे मांस आखाती देशांना विकण्याचे एक मोठे रॅकेट आहे.

Milind Ekbote
ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर सरन्यायाधीश लळित, महाधिवक्ता कुंभकोणींना भेटले; पण...

त्यामुळे हे असे कत्तलखाने कधीही बंद होत नाहीत. फलटण तालुक्यातील बारामती रस्त्यावर तसेच शहरातील सोमवार पेठेत असणारे बेकायदेशीर कत्तलखाने हा खरा अडचणीचा विषय आहे. बारामती रस्त्यावरील कत्तलखान्यामुळे सोमंथळी आणि सांगवी गावातील पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. या लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

Milind Ekbote
फलटण पोलिसांची धडाकेबाजी कारवाई : मोटार सायकल चोरणारी टोळी जेरबंद

या बेकायदेशीर गोमांस निर्यातीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पैसा हा आखातात दिला जातो. तोच पैसा एका मशिदीच्या बँक अकाऊंटवर जमा होऊन ती रक्कम भारतात अतिरेकी संघटनांना पुरवली जाते. यासंदर्भात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची उच्चस्तरीय चौकशी सुद्धा झाली होती, अशी माहिती श्री. एकबोटे यांनी दिली.

Milind Ekbote
रामराजे देशाच्या राजकारणात सक्रिय होणार; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीवर निवड

फलटण तालुक्यात हिंदू धर्माच्या श्रद्धेची अवहेलना केली जात आहे. फलटण नगरी ऐतिहासिक असून येथे रामाचे प्रसिद्ध मंदिर असून जैन धर्मियांचे सुद्धा पवित्र तीर्थस्थळ आहे. स्वतः रामराजे हे एक प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांच्या नावातही राम आहे. असे असताना राजकीय आशिर्वादामुळे बेकायदेशीर कत्तलखाने सुरू राहावेत हे फलटणच्या परंपरेला शोभणारे नाही.

Milind Ekbote
Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

त्यामुळे याची ईडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी श्री. एकबोटे यांनी केली. सोमवार पेठ आणि बारामती रस्त्यावरील कत्तलखान्यांवर कारवाई न झाल्यास वारकरी संप्रदाय, अखिल भारत कृषी गोसेवा संघर्ष प्रतिष्ठान या संघटना फलटणमध्ये तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Milind Ekbote
Satara : भाजपमध्ये अनेक प्रवेश होणार आहेत; जयकुमार गोरेंचा विश्वास

शिवप्रताप दिनासाठी समितीला परवानगी द्या

सातारा जिल्ह्यात 1996 सालापासून प्रतापगड उत्सव समिती शिवप्रताप दिन साजरा करत आहे. गेल्या तीनवर्षापासून प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा झालेला नाही. शासनाला या उत्सवाची आठवण येत नसेल किंवा त्यांना जमत नसेल तर हा उत्सव प्रतापगड उत्सव समितीला शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी दिला जावा. सरकारने त्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com