ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर सरन्यायाधीश लळित, महाधिवक्ता कुंभकोणींना भेटले; पण...

विशेष करून लळित आणि नार्वेकरांत खूप साऱ्या मुद्दयांवर चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
Milind Narvekar meet Chief Justice Uday Lalit
Milind Narvekar meet Chief Justice Uday LalitSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू आणि निष्ठावंत शिवसैनिक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे शिंदे गटासोबत जाणार असल्यावरून राजकीय वादळ उठले. दुसरीकडे, आपल्याभोवती राजकीय धुरळा उडत असताना नार्वेकर हे देशाचे सरन्यायाधीश उदय लळित (Uday Lalit) आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली. नार्वेकर, ललित आणि कुंभकोणी यांच्यातील भेट राजकीय नव्हे; तर दक्षिणेतील एका कार्यक्रमात हे तिघे एकत्र असल्याचे दिसून आले आहे. विशेष करून लळित आणि नार्वेकरांत खूप साऱ्या मुद्दयांवर चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. (Milind Narvekar meet Chief Justice Uday Lalit)

Milind Narvekar meet Chief Justice Uday Lalit
नितीशकुमार सरकारमधील मंत्र्याची अवघ्या दीड महिन्यात पडली विकेट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यापासून शिंदे आणि नार्वेकरांमधील भेटीचा राजकीय अर्थ काढून, नार्वेकर फुटण्याचा निष्कर्ष काढला जात आहे. त्यापलीकडे जाऊन शिंदे सरकारमध्ये नार्वेकर हे कॅबिनेट मंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या भूमिकांकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील बंडापेक्षा अधिक चर्चा नार्वेकरांच्या फुटण्याची रंगत आहे. त्यात शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नार्वेकर हे शिंदेंकडे येणार असल्याचे जाहीर केले. त्यावरून गेली ३६ तास नार्वेकर हे पुन्हा राजकीय वर्तुळात ओढले गेले आहेत. त्यावर थेट मुख्यमंत्री शिंदे यांनीही भूमिका मांडली आणि नार्वेकरांच्या प्रवेशाच्या चर्चेवर भाष्य केले तरीही, शिंदे-नार्वेकरांच्या गाठीभेटीचे जुने संदर्भ देत, नार्वेकर काय भूमिका घेणार? याची उत्सुकता असल्याचे दिसत आहे.

Milind Narvekar meet Chief Justice Uday Lalit
...तर विक्रम काळे उस्मानाबादचे आमदार झाले असते : अजित पवारांनी सांगितला तिकिटाचा किस्सा!

मुळात, बंडानंतर अनेकदा ‘मी उद्धव ठाकरेंचा आनंद दिघे आहे,’ असे उघडपणे सांगून नार्वेकरांनी स्वत:च ठाकरेंची साथ कधीच सोडणार नसल्याचे ‘सोशल मीडिया’तून जाहीर केले आहे. तरीही, शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांनी नार्वेकरांबाबत संभ्रम निर्माण करून नवा राजकीय गोंधळ उडवला आहे. अशा गोंधळात नार्वेकर हे तिरुमला तिरुपती देवस्थानच्या उत्सवात लळित आणि कुंभकेणी यांच्यासह सहकुटुंब असल्याचे नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवरून स्पष्ट झाले. ठाकरे आणि शिंदे गटातील न्यायालयातील संघर्षापासून ललित हेही चर्चेत आहेत. त्यातच नार्वेकर आणि लळित यांची भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com