अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील मोहोजदवढे - रुपनरवाडी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) यांनी भारनियमनावरून महाविकास आघाडीवर टीका केली. ( Monica Rajale said, there was no weight regulation during the coalition government )
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते भीमराव फुंदे, महिला आघाडीच्या प्रमुख काशीताई गोल्हार, सरपंच अर्चना हाके, सुभाष केकाण, नवनाथ धायतडक, दिनकर देवढे, नारायण काकडे, बाळासाहेब गोल्हार, बाबासाहेब किलबिले, नारायण पालवे, हर्षद गर्जे, उद्धव माने, भगवान आव्हाड आदी उपस्थित होते.
मोनिका राजळे म्हणाल्या, आम्ही कायम विकासाचा अजेंडा घेवुन जनतेसाठी काम करतो. मोहोज देवढे व परिसरातील वाड्या वस्त्यावरील रस्ते व विकासाच्या कामासाठी निधी दिलेला आहे. तुमचे पाठबळ माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या काळापासून ते आजही आम्हाला मिळालेले आहे. पूर्वीचे युतीचे सरकारच्या काळात कधी भारनियमन व कृषीपंपाची वीज तोडली नव्हती. आता विजेची परिस्थिती अवघड आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही आमदार राजळे यांनी केले.
आमदार राजळे पुढे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते व पूल वाहुन गेले. बंधारे फुटले आहेत. ही सर्व कामे नव्याने करावी लागतील. रुपनरवाडीच्या रस्त्यासाठी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. बहीरवाडीचा रस्ताही करण्यात येईल. मोहोजदेवढे ते पिंपळगव्हाण रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून घेण्याचा प्रयत्न करु. येथील अभ्यासिकेच्या इमारतीसाठी निधी दिला आहे. हनुमान मंदिरासमोरचा अपुर्ण असलेला सभामंडप निधी देवून पूर्ण करू. हे गाव व परिसरातील वाड्यांनी राजळे कुटुंबावर कायम प्रेम केलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.