पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी देणार – अजित पवार

शिर्डी येथील पोलिस अंमलदारांच्या 112 निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते झाले.
Ajit Pawar & Dilip Walse Patil
Ajit Pawar & Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलिस अंमलदारांच्या 112 निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते झाले. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. ( More funding for police facilities and households - Ajit Pawar )

या उद्घाटन कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार किशोर दराडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Ajit Pawar & Dilip Walse Patil
Video: देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात; दिलीप वळसे पाटील

अजित पवार पुढे म्हणाले की, यावर्षी आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील 75 पोलिस ठाण्यांचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमांसाठी 860 कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत जुलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल, असा शब्द अजित पवार यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला.

पोलिसांसाठी 535 स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही, तसेच पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Ajit Pawar & Dilip Walse Patil
नरसिंहरावांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा केव्हा द्यायचा, हे स्पष्ट सांगितलं होतं...

शिर्डी विमानतळ विकासासाठी 150 कोटी

शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी 150 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कार्गो टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Ajit Pawar & Dilip Walse Patil
राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात - अजित पवार

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज्यातील पोलिसांना अशी सुसज्ज निवासस्थाने मिळाली, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. ज्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक व दरारा वाढेल असा विश्वास पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला वाटतो. अहमदनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील, अवैध धंदे कसे बंद होतील आणि पोलिस ठाण्याचा कारभार कसा पारदर्शक होईल आणि सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, याकडे पोलिसांनी अधिकाधिक लक्ष द्यावे. सरकार पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण पोलिसांनी देखील सरकारचे प्रतिनिधी म्हणून तळागाळात सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी पारदर्शक पद्धतीने काम केले पाहिजे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com