Satara ST News : साताऱ्यातील १७३ हून अधिक एसटी बस कालबाह्य; नवीन २०० बसची व्यवस्था करा : श्रीनिवास पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MP Shrinivas Patil जिल्‍ह्यात सहा महिन्‍यांपासून एसटी बससेवा विस्कळीत असून, १७३ बस परिवहन विभागाच्‍या नियमानुसार स्‍क्रॅप केल्याचे समजते, असेही खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे.
MP Srinivas Patil, CM Eknath Shinde
MP Srinivas Patil, CM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

MP Shrinivas Patil News : जिल्ह्यातील नादुरुस्त व अपुऱ्या एसटी बसमुळे प्रवाशी सेवा विस्कळीत आहे. परिणामी नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याने जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्‍या एसटी बस हटवून नवीन २०० बसची व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी शासनाकडे केली आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, एसटीचे उपाध्‍यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्‍ने, विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांना खासदार पाटील यांनी पत्र पाठविली आहेत.

खासदार श्रीनिवास पाटील Shirnivas Patil यांनी पत्रात म्हटले आहे, की राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या State Transport जिल्‍ह्यातील ११ आगारांतील सुमारे १७३ हून अधिक एसटी बसेस कालबाह्य झाल्या आहेत. त्या बसेस रस्‍त्‍यावर चालण्‍यायोग्य नाहीत. प्रवाशी संख्‍येच्‍या तुलनेत बसेस खूपच कमी आहेत.

जिल्‍ह्याचा पश्चिम ग्रामीण भाग डोंगरदर्‍यांच्या तालुक्याच्‍या व जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी बसशिवाय सामान्‍यांना परवडणारा पर्याय नाही. हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी जिल्‍ह्याच्‍या व तालुक्‍याच्‍या ठिकाणी दररोज प्रवास करतात. मुंबई, पुणे, ठाणेसह राज्‍यातील अन्य भागामध्‍ये व परराज्‍यामध्‍ये जाणाऱ्या राज्‍यातील प्रवाशांची संख्‍या जिल्‍ह्यात मोठी आहे.

याशिवाय महिला सन्‍मान योजना, अमृत ज्येष्‍ठ नागरिक योजना व इतर सवलतींमुळे प्रवाशी वर्ग एसटीकडे वळला आहे. त्यामुळे एसटी बसेस हाऊसफुल होतात व प्रवाशांच्‍या लांबच लांब रांगा उभ्‍या असतात. जिल्‍ह्याच्‍या व तालुक्‍याच्‍या ठिकाणी सहा महिन्‍यांपासून जिल्‍ह्यातील एसटी बस सेवा विस्कळीत झाली आहे. १७३ बस परिवहन विभागाच्‍या नियमानुसार स्‍क्रॅप केल्याचे समजते.

MP Srinivas Patil, CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा काय म्हणाले ? । Eknath Shinde । Short । NCP ।

अजूनही पुढे सहा महिन्‍यांनी ५० बसेस कालबाह्य करून स्क्रॅप होणार असल्याची माहिती मिळते. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना सध्‍याच्‍या परिस्थितीत खूपच त्रास होत असल्‍याबाबतच्‍या तक्रारी माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्‍हणून नेहमी येतात. त्यामुळे जिल्‍ह्यासाठी नवीन २०० एसटी बसेस दिल्‍यास जिल्‍ह्यातील असणाऱ्या ११ आगारांमध्‍ये चांगल्‍या प्रकारे ग्रामीण व शहरी प्रवाशांची व विद्यार्थ्यांची सोय होईल. तसेच राज्‍य परिवहन मंडळाचे उत्‍पन्‍नही माेठ्या माणात वाढेल अशी आशा आहे.

Edited By Umesh Bambare

MP Srinivas Patil, CM Eknath Shinde
Mahabaleshwar ST News: 'एसटी'चे वरिष्ठ अधिकारीच पाळेनात मुख्यमंत्र्यांचा आदेश; काय आहे प्रकरण...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com