
Kolhapur News : गेले अनेक दिवस कोल्हापूर शहर भाजपमधील अंतर्गत वाद हा महानगर जिल्हाध्यक्षपदावरून धुमसत होता. या पदावरून विद्यमान जिल्ह्याध्यक्ष विजय जाधव आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यात चांगलीच जुंपली होती. मध्यंतरी हा वाद हमरीतुमरीवर देखील गेल्याची चर्चा होती. अखेर शनिवारी भाजपकडून जिल्ह्यध्यक्ष पदाची यादी जाहीर झाली आणि या वादावर पडदा पडला. कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष पदावर विजय जाधव यांची पुन्हा वर्णी लागली. त्यामुळे भाजमधील काही जणांची नाराजी तर काहीजणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. दरम्यान जाधव यांचे जिल्हाभर अभिनंदन झाले आहे. तर रविवारी त्यांचे भाजप कार्यालयात प्रवेशाचा मुहूर्त ठरला. त्याच वेळी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या मानपानावरून नवा वाद सुरू झला असून यावर अनेकांची नाराजी समोर आली आहे.
नूतन निवड झालेल्या विजय जाधव यांचा रविवारी साडेचार वाजता भाजप कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित होते. मात्र नियोजित वेळ होऊनही विजय जाधव कार्यालयात उपस्थित नव्हते.
शिवाय महाडिक हे देखील कार्यालयात बऱ्याच उशीर वाट पाहत होते. भाजपचे इतर प्रमुख पदाधिकारी दाखल झाले होते. मात्र तरीदेखील विजय जाधव हे भाजप कार्यालयात आले नव्हते. अखेर धनंजय महाडिक यांनी भाजप कार्यालयातून जाणेच पसंत केले. यावेळी महाडिक यांच्या चेहऱ्यावर चांगलाच राग दिसून आला.
महाडिक गेल्यानंतर जाधव यांचे भाजप कार्यालयात आगमन झाले. जाधव हे मिरवणुकीने कार्यालयात येत असल्याची माहिती उपस्थितांना मिळाली होती. मात्र जाधव यांच्या मागे काही मोजकेच कार्यकर्ते होते. दरम्यान महाडिक गेल्यामुळे जाधव यांच्या कार्यालयीन प्रवेश महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र महाडिक कार्यक्रमापूर्वी भाजप कार्यालयात जोरात सुरु होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.