Satara News : संभाजी भिडेंच्या सभेस परवानगी देऊ नये : परिवर्तनवादी संघटनांची मागणी

Sambhaji Bhide श्री. भिडे यांचा पुर्वेतिहास पाहता त्यांच्याकडून भडकावू व प्रक्षोभक भाषणे होण्याची शक्यता आहे. यातून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते व कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
Sambhaji Bhide Guruji
Sambhaji Bhide Gurujisarkarnama
Published on
Updated on

Satara News : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख असलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांची वेगवेगळ्या ठिकाणची प्रसिद्ध होणारी मागील काही दिवसातील भाषणे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी, ध्वजसंहितेचा भंग करणारी आहेत. त्याचबरोबर धार्मिक तेढ निर्माण करून हिंसेला उद्युक्त करणारी आहेत. त्यामुळे उद्या (रविवारी) सातारा येथील न्यु इंग्लिश स्कुलच्या मैदानावर होणारया त्यांच्या जाहीर सभेस परवानगी देऊ नये, अशी मागणी सातारा शहरातील परिवर्तनवादी संघटनांनी केली आहे.

सातारा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान Shivpratisthan Hindustan संघटनेचे प्रमुख असलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडे Sambhaji Bhide यांची उद्या (रविवारी, ता. २ जुलै ) येथील न्यु इंग्लिश स्कुलच्या मैदानावर जाहीर सभा हाोत आहे. श्री. भिडे यांचा पुर्वेतिहास पाहता त्यांच्याकडून भडकावू व प्रक्षोभक भाषणे होण्याची शक्यता आहे.

यातून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते व कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सभेस परवानगी देण्यात येवू नये, अशी मागणी करणारे लेखी निवेदन सातारचे पोलीस अधीक्षक आणि शाहुपुरी पोलीस ठाण्यात परिवर्तनवादी संघटनांकडून देण्यात आले आहे.

Sambhaji Bhide Guruji
Satara News : शंभूराज देसाईंची संजय राऊतांवर टीका...म्हणाले, तो तर चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट

यामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मुक्तिवादी , राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन, परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, राष्ट्र सेवा दल, रिपब्लिकन सेना या संघटनेच्या पदाधिकारी यांनी हे निवेदन दिले आहे. या निवेदनावर जयंत ऊथळे, विजय मांडके ,भगवान अवघडे, चंद्रकांत खंडाईत , प्रकाश टोपे , गणेश कारंडे , वामनराव गंगावणे व प्रकाश खटावकर यांच्या सह्या आहेत.

Sambhaji Bhide Guruji
Pune News : जीवाचे बरं वाईट झालं तरी उपोषणापासून मागे हटणार नाही: दरेकरांचा इशारा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com