ranjitsinh naik nimbalkar : खासदार निंबाळकर कर्मचाऱ्यांवर संतापले; म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागाल तर...

ranjitsinh naik nimbalkar : फलटण येथील अधिकार गृहातील दरबार हॉल येथे आज खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
MP Ranjitsinh Naik Nimbalkar
MP Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

-किरण बोळे

Phaltan News : फलटण तालुक्यातील Phaltan तलाठी, ग्रामसेवक व प्राथमिक शिक्षक यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजवावे. जर कुणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागत असेल तर यापुढे ते खपवून घेणार नाही. वागणं बादला सर्वसामान्य जनतेची कामे करा. जर कोणास कामासाठी हेलपाटे मारायला लावले किंवा गरिबांना छळलं तर संबंधितांनी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा परखड इशारा खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी दिला.

फलटण येथील अधिकार गृहातील दरबार हॉल येथे आज खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना हा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या उपमुख्य कार्यकारी अधिकरी अर्चना वाघमळे, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, अप्पर तहसीलदार दादासाहेब दराडे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण, भाजपचे (BPP) प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Raj Thackeray News राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; बाळासाहेबांच्या नावावर मुंबईचा महापौर बंगला ढापला...

बऱ्याच ठिकाणी तलाठी नोंदी करण्यासाठी पैसे मागतात. नेमणूकीच्या गावात ग्रामसेवक हजर राहत नाहीत, एकाच कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. अनेक तलाठी, ग्रामसेवक व शिक्षक यांचा मोठा वेळ राजकारणात जातोय, त्या संबंधितांच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या असून त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही तर त्यांनी परिणामांना समोर जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा देत खासदार रणजितसिंह म्हणाले, शिक्षकांनी गावातील राजकारणात सहभागी होण्यापेक्षा व अन्य बाबीत गुंतण्यापेक्षा विद्यार्थी घडविण्यावर लक्ष केंद्रित करावे. करमाळ्यात नुकतीच चार शिक्षक वाळू व्यवसायातून निलंबित केले आहेत. फलटण तालुक्यातील अनेक शिक्षक या रांगेत आहेत, तेव्हा शिक्षकांनी आपल्यावर तशी वेळ येवू नये असा इशाराही दिला.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Raj Thackeray News : पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख, म्हणत राज ठाकरेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

यावेळी उपस्थितांनी आपल्या समस्या व प्रश्न खासदारांसमोर मांडले. संबंधित प्रश्नांचा खासदारांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना त्यासंबंधी विचारणा करुन ते तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com