Maan Political News : 'ते' ज्यांना टिळा लावतील 'ते' साताऱ्याचे खासदार होतील!

Maharashtra Politics: जयकुमार गोरे यांच्यारुपाने दुष्काळाचा कलंक पुसणारा आमदार आपल्याला भेटला आहे.
Maan Political News
Maan Political News Sarkarnama
Published on
Updated on

Maan political news: विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत कुळकजाई (ता. माण) येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चांगलीच टोलेबाजी केली. विशेष म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाचे गोडवे गाताना 'ते ज्यांना टिळा लावतील ते साताऱ्याचे खासदार होतील' असे स्पष्ट मत व्यक्त केले.

यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, गणेश सत्रे, शिवाजीराव शिंदे, जयकुमार शिंदे, अरुण गोरे, अर्जुन काळे, दादासाहेब काळे, धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे उपस्थित होते.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, 'रोजगार हमी, निम्मं तुम्ही, निम्मं आम्ही, खाली काहीच नाही' असा कारभार गेल्या सत्तर वर्षात झाला. मात्र भाजप सरकारने हे सर्व बदलून टाकलं आहे.आमदार जयकुमार गोरे यांच्यारुपाने दुष्काळाचा कलंक पुसणारा आमदार आपल्याला भेटला आहे. सर्वात चांगलं काम झालेला मतदारसंघ कोणता असेल तर तो माण आहे. दिलेल्या शब्दासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व जयकुमार गोरे यांचं आहे, असेही ते म्हणाले.

Maan Political News
Pune News: फडणवीसांकडून पुणेकरांची बोळवण! आश्वासन हवेतच विरले

दरम्यान, "निवडणुका जवळ आल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी काहींना प्रेम उफाळुन आले आहे. फलटण शहरात त्यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्याची आवई उठवून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न फलटणकर खपवून घेणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी केलेल्या आरोपाला संजीवराजे निंबाळकर Sanjivraje Naik Nimbalkar यांनी प्रतिउत्तर दिले. संजीवराजे म्हणाले, फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारुन त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेले आदर्श समाजासमोर विशेषतः तरुणांसमोर ठेवण्यासाठी आम्ही आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहोत.

Maan Political News
Meera Manjhi: मीरा मांझींना दुहेरी आनंद; मोदींनी चहा प्यायला अन् जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्यमान कार्ड घरी आणून दिलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com