मोठी बातमी : खासदार निंबाळकरांचा रेल्वे समितीचा राजीनामा; पुण्यातील बैठकीतून ९ खासदारांचा ‘वॉक आऊट’

सोलापूर आणि पुणे रेल्वे विभागीय समितीच्या बैठकीत प्रत्येक प्रश्नावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नकारात्मक उत्तरे देण्यात येत होती.
Pune Divisional Railway Committee Meeting
Pune Divisional Railway Committee MeetingSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) आणि पुणे (Pune) रेल्वे (Railway) विभागीय समितीच्या बैठकीत प्रत्येक प्रश्नावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नकारात्मक उत्तरे देण्यात येत होती, त्यामुळे संतप्त झालेल्या तब्बल ९ खासदारांनी बैठकीतून बाहेर पडले. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने वैतागलेले माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (MP Ranjitsingh Nimbalkar) यांनी विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation) दिला आहे. (MP Ranjitshinh Nimbalkar's resignation from the Divisional Railway Committee)

पुणे आणि सोलापूर विभागीय समितीची बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या समितीत ३६ खासदार आहेत. बैठकीत पूर्वी बंद केलेल्या रेल्वे सुरू करण्यात याव्यात. तसेच, जे थांबे बंद करण्यात आले आहेत, ते सुरू करण्यात यावेत अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांची भूमिका कायम निगेटिव्ह राहिली आहे, त्यामुळे मी रेल्वेच्या विभागीय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा खासदार नाईक निंबाळकर यांनी पुण्यात केली.

Pune Divisional Railway Committee Meeting
भास्कर जाधव औकातीत राहा; राणेंच्या नादाला लागू नका : नीलेश राणेंचा हल्लाबोल

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जेऊरसारख्या भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या प्रश्नावर हा वाद झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या वादाची रेल्वे मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Divisional Railway Committee Meeting
शहाजी पाटलांचा दोनच दिवसांत ‘यू टर्न’ : विधानसभा निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा

यासंदर्भात खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, सोलापूर आणि पुणे विभागातील नऊ खासदार बैठकीला उपस्थित होतो. खासदारांच्या मागण्या आणि अडचणी सुचिवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून तीन आठवड्याभरापूर्वी सांगण्यात आले होते. त्या अडचणी या बैठकीत सोडविण्याचे आश्वासन दिले होते. रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रेझेंटशन झाल्यानंतर त्यांच्याकडून आमच्या बहुतांश प्रश्नाला निगेटिव्ह उत्तरे होती. आमच्या पातळीवरचे हे विषय नाहीत, असे सांगून ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी असमर्थतता दर्शवली. त्यामुळे बहुतांश खासदार संतप्त झाले. त्यामुळे खासदार निंबाळकर यांनी विभागीय समितीचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com