पंढरपूर : आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी ‘मला विधान परिषदेवर पाठवा आणि अभिजित पाटलांना सांगोल्यातून (Sangola) आमदार करा’ या विधानापासून अवघ्या दोन दिवसांतच यू टर्न घेतला आहे. सांगोला विधानसभा मतदार संघातील जनेतचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांचे उपकारदेखील माझ्यावर आहेत. दुष्काळी सांगोला तालुक्याचे नंदनवन करण्याचे माझे स्वप्न आहे. येत्या दोन वर्षांत सांगोल्याच्या दुष्काळी शिवारात पाणी पोच करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारनेही मोठ्या मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यापुढची विधानसभेची निवडणूक (assembly election) मी स्वतः लढवणार आहे, अशी घोषणा आमदार पाटील यांनी आज केली. (I will contest the next assembly election from Sangola : Shahaji Patil)
दोन दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभ कार्यक्रमात बोलताना ‘सांगोल्यातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला विधान परिषदेवर पाठवा’अशी विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांना केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर सांगोला आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यावर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी मैदानातून पळ काढल्याचा आरोप करत आमदार पाटील यांच्यावर जोरदार टिका केली होती. समाज माध्यमातही त्याचे पडसाद उमटले होते.
दरम्यान, पंढरपुरात बोलताना आज (ता. १८ ऑक्टोबर) आमदार शहाजी पाटील यांनी म्हणाले की, पंढरपूरच्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य हे गंमतीने केलेले होते. सांगोल्याच्या मैदानात देशमुख आणि पाटील यांचीच कुस्ती आतापर्यंत झाली आहे. यापुढच्या निवडणुकीत देखील पारंपारिक देशमुखांच्या विरोधात मी लढण्यास तयार आहे. मैदानातून पळ काढणाऱ्यांपैकी मी नाही. विरोधकांना टीका करण्यासाठी दुसरे काही नाही, त्यामुळे अशा वक्तव्यावरुन ते टीका करत आहेत. सांगोला तालुक्यातील जनेतची कामे करण्यासाठी मी कायम कद्धिबद्ध आहे. अखेरपर्यंत जनतेची सेवा करणार, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
शहाजी पाटील नेमकं काय म्हणाले होते?
सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्या सारखं विधान परिषदेवर पाठवा, अशी जाहीर मागणी आमदार पाटील यांनी भाजप नेते दरेकर यांच्याकडे पंढरपुरात बोलताना केली हेाती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.