Congress news; डॉ. सुधीर तांबे यांनी तीन महिने काय केले?

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक; डॉ. तांबेंची माघार, सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज
Satyajeet Tambe & Dr. Sudhir Tambe
Satyajeet Tambe & Dr. Sudhir TambeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक (Nashik) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी काँग्रेसचा (Congress) एबी फॉर्म बाजूल ठेवत मुलगा सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

डॉ. तांबे यांना काँग्रेसने 7 ऑक्टोबरला उमेदवारी जाहीर केली होती. उमेदेवारी नकोच असेल तर या तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी काय केले, हा प्रश्न आहे. यामध्ये काँग्रेस आणि टीडीएफ (TDF) यांची फसवणूक झाली हे मात्र नक्की. (Congress as well TDF both feels deceived in Nashik Graduate constituation election)

Satyajeet Tambe & Dr. Sudhir Tambe
Nashik News : नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसचं ठरलं; पण भाजपचं अद्यापही भिजत घोंगडं!

गुरुवारी (ता. १२) अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या आणि ५४ तालुक्यांच्या मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी माघार घेऊन मुलगा सत्यजित तांबे याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

Satyajeet Tambe & Dr. Sudhir Tambe
China News : चीनमधील भारतीय विद्यार्थी,नोकरदार असुरक्षित; 'ही' धक्कादायक माहिती समोर

आमदार तांबे यांनी तरुणांना संधी देण्याची गरज आहे. त्यासाठी उमेदवारी केली नाही, असा दावा केला आहे. मात्र डॉ. तांबे यांची उमेदवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 7 ऑक्टोबरला मुंबईत जाहीर केली होती. यावेळी श्री. पटोले यांनी अन्य मतदारसंघांचा निर्णय सुरु आहे. मात्र आमदार तांबे यांना पुन्हा संधी देण्यात येईल. या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या.

त्यानंतर पुढील महिन्यात टीडीएफ संघटनेने पुणे येथे झालेल्या बैठकीत तांबे यांना पाठींबा जाहीर केला. तीन महिन्यांपूर्वी उमेदवारीचा निर्णय झालेलाअसताना उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तांबे यांनी सत्यजीत तांबे यांचा एबी फॉर्म नव्हता असा दावा केला. तसे अशेल तर तीन महिने त्यांनी काय केले?.

या कालावधीत त्यांचे सबंध कार्यालय निवडणूक तयारीत व्यस्त होते. तीन महिन्यात त्यांनी पक्षाकडे मुलासाठी उमेदवारी मागीतली का?. तशी मनीषा जाहीर केली का?. तसे काहीही झालेले नव्हते. हे अत्यंत सुचक आहे.

अर्ज दाखल करण्याची आज अखेरची मुदत होती. यात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांच्याकडे काँग्रेसचा एबी फॉर्म असूनही त्यांनी पक्षातर्फे अर्ज भरला नाही. दरम्यान, अपक्ष अर्ज भरला असला तरी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. वेळेवर काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली.

Satyajeet Tambe & Dr. Sudhir Tambe
Satyajeet Tambe News : नाशिकसाठी 'ती' बैठक ठरली महत्त्वाची; तांबेंच्या उमेदवारी संदर्भात पडद्यामागे काय घडले?

माघारीपर्यंत काय काय होणार?

काँग्रेसकडून नाशिकच्या जागेसाठी गुरुवारी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे एबी फॉर्म त्यांच्या नावाने होता. ऐनवेळी यात बदल झाला, डॉ. तांबे यांनी माघार घेतल्याने आणि वेळेत एबी फॉर्म न आल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत काय घडामोडी घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसते. मात्र पुरस्कृत उमेदवाराला कोणताही पक्ष पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे पुढे काय होणार, यासंदर्भात मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

ही जागा बिनविरोध करण्यासाठी मी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना विनंती करणार आहे. विधान परिषदेच्या अनेक जागांच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. मागची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही जागादेखील बिनविरोध करावी, अशी विनंती मी करणार आहे.

- सत्यजित तांबे, अपक्ष उमेदवार

---

नवीन तरुणांना संधी मिळावी म्हणून मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यजित तांबे यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध नाही. सत्यजितकडे व्हीजन आहे. गेली २० वर्षे तो संघटनेत काम करतोय, आताही तो चांगला काम करेल.

- डॉ. सुधीर तांबे, विद्यमान आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com