Sujay Vikhe Patil News : लव्ह जिहादवरुन सुजय विखे आक्रमक; संसदेत भूमिका मांडणार

monsoon session : अहमदनगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात लव्ह जिहादच्या दोन-तीन घटना घडल्या आहेत.
Sujay Vikhe Patil News
Sujay Vikhe Patil NewsSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : हिंदू माता-भगिनींवरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव्ह जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज असून, अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी इथे सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधे शनिवारी (ता. ५) सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले, संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अविश्वासाच्या ठरावावर बोलताा लव्ह जिहादच्या कायद्या विषयी आपण निवेदन करू, अशी ग्वाही दिली.

Sujay Vikhe Patil News
Kirit Somaiya News : सोमय्यांचा पहिला ‘व्हिडिओ’ व्हायरल; ठाकरेंचे तिघेजण जेलमध्ये जाणार ?

अहमदनगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात लव्ह जिहादच्या दोन-तीन घटना घडल्या आहेत. त्यामध्ये बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला वेळोवेळी आपण कडक शब्दात सूचना केल्या असल्याचे सांगताना, जिल्ह्यातील माता भगिनींच्या पाठीशी हा भाऊ सदैव असून त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, हाच विश्वास देण्यासाठी या मोर्चात आपण सहभागी झालो असल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

Sujay Vikhe Patil News
Kishore Patil News : पत्रकाराला शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार पाटील म्हणतात... ही बाळासाहेबांची स्टाईल

संसदेचे अधिवेशन (monsoon session) सुरू असून विरोधकांच्या गदारोळामुळे अनेक महत्वाचे विषय सभागृहात चर्चेला येत नाहीत. त्यामुळे जनतेचेच नुकसान होत आहे. या आठवड्यात अविश्वास ठरावावर चर्चा होणार असून यात लव्ह जिहाद कायदा करण्यासंदर्भात आपण नक्की निवेदन करू, असे सुजय विखे यांनी सांगितले. खासदार विखे, माजीमंत्री शिवाजी कर्डीले आदी भाजप (BJP) नेत्यांनी जन आक्रोश मोर्च्यात सहभाग घेतला. मात्र, मोर्चा पक्षविरहित असल्याने सभेच्या ठिकाणी त्यांनी नागरिकांत बसने पसंत केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com