
Satara News : आमच्या सातारा विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात जे जे होते ते सर्व पूर्ण केले आहे. पण,इतके वर्षे तुमच्याकडे सत्ता होती, त्यावेळी का कामे झाले नाहीत. दुसऱ्याला नावे ठेवण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. पण, त्यांच्या नावे ठेवण्यामुळे आम्हाला दृष्ट लागणार नाही, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंची खिल्ली उडवली. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रीपदाला माझी आडकाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांनी जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकची Karnataka पूर्नरावृत्ती महाराष्ट्रात होईल असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. यावर उदयनराजे म्हणाले, एका राज्यात जे घडले त्याचा परिणाम दुसऱ्या राज्यात घडेल असे नाही. महाराष्ट्रात निवडणुक लागल्यावर बघू.
शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेवर ते म्हणाले, या प्रश्नाला उत्तर देणे मला योग्य वाटत नाही. कारण नारळ फोडी गॅंग असे ते आम्हाला म्हणतात. पण नारळ फोडत नसतात तो वाढविला जातो, हे त्यांनी समजून घ्यावे. मला त्यांचे नावही घ्यायचे नाही. आमच्या जाहीरनाम्यात होते ते सर्व पूर्ण केले आहे.
इतके वर्षे तुमच्याकडे सत्ता होती, त्यावेळी का कामे झाले नाहीत. उलट आमच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आली की सर्व कामे झाली. दुसऱ्याला नावे ठेवण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. पण, त्यांच्या नावे ठेवण्यामुळे आम्हाला दृष्ट लागणार नाही. मंत्री मंडळा विस्तारात आमदार शिवेंद्रसिंहराजेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले, याबाबत मला महिती नाही, माझी त्यांच्या मंत्रीपदाला आडकाठी नाही.
राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु असून तुमच्या विरोधात रामराजेंची उमेदवारी असेल तर तुम्हाला आव्हान वाटेल काय, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, लोकशाही आहे, कोणी कुठूनही उभे राहू शकते. प्रत्येकाला अधिकार आहे. अजून लोकसभा निवडणूक लांब आहे. ज्या त्यावेळी कोण विरोधात आहे, त्यावर ठरवू.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.