Ajit Pawar, Udayanraje Bhosale, Abhijit Bapat
Ajit Pawar, Udayanraje Bhosale, Abhijit Bapatsarkarnama

पुण्याच्या विश्रामगृहात उदयनराजे, अजित पवार भेटले...

सातारा पालिकेच्या Satara Palika विकास कामांच्या निमित्ताने हा भेटीचा योगायोग असला तरी या दोघांनी आपले पूर्वीचे वैरत्व विसरत विकास कामांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे.

सातारा : सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील भागात सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी ५० लाख रूपये इतके अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील शासकिय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.

खासदार उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वैरत्व सर्वांनाच माहिती आहे. पण, आज सातारा पालिकेच्या विकास कामांच्या निमित्ताने खासदार उदयनराजेंनी पुण्यातील शासकिय विश्रामगृहातील व्हीव्हीआयपी सुटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी ४८ कोटी ५० लाख रूपयांचे अनुदान राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी केली.

Ajit Pawar, Udayanraje Bhosale, Abhijit Bapat
उदयनराजे अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा'वर फिदा; थिएटरमध्ये जाऊन घेतला आनंद

याबाबतचे निवेदनही त्यांनी श्री. पवार यांना दिले. या निवेदनात उदयनराजेंनी म्हटले की, सातारा पालिकेच्या हद्दवाढीमुळे सध्याच्या तिप्पट भागाचा समावेश झालेला आहे. ६० हजार ३७३ इतक्या लोकसंख्येचा यामध्ये समावेश झालेला आहे. या वाढीव लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे सातारा पालिकेला शक्य नाही. त्यामुळे नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या या भागात सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिले जाते. त्यासाठी सातारा पालिकेस ४८ कोटी ५० लाख रूपयांचे अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Ajit Pawar, Udayanraje Bhosale, Abhijit Bapat
दारु आणि वाईन यामध्ये जमीन अस्मानचा फरक; अजित पवार

सातारा पालिकेतील विविध विकासात्मक विषयांवर उदयनराजे व अजित पवार यांच्यात तासभर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी आपले एकमेकांचे हेवदावे बाजूला ठेवत साताऱ्याच्या विकास कामांच्या विविध विषयांवर चर्चा केली. सातारा पालिकेच्या विकास कामांच्या निमित्ताने हा भेटीचा योगायोग असला तरी या दोघांनी आपले पूर्वीचे वैरत्व विसरत विकास कामांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. पण, राजकिय वर्तूळात या योगायोगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com