Ladki Bahin Yojana: धक्कादायक: लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Anganwadi Sevika Surekh Aatkare Death : सोलापूर जिल्ह्यात ही घटना ठरली. सुरेखा रमेश आतकरे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.
Ladki Bahin Yojana:
Ladki Bahin Yojana:Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे, अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात ही घटना ठरली. सुरेखा रमेश आतकरे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देगाव येथील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये ही घटना घडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर दिली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून 'नारी दूत' या अॅपवरून फॉर्म भरीत आहेत.

देगाव मधील अंगणवाडी क्रमांक १ च्या सेविका सुरेखा रमेश आतकरे या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होत्या, त्यावेळी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या खुर्चीतच कोसळल्या. यावेळी मदतनीस किचनमध्ये भांडी स्वच्छ करत होत्या. जोराचा आवाज झाला म्हणून घाबरून त्या बाहेर आल्या असता सुरेख आतकरे या खुर्चीत निपचित पडल्याचे त्यांना दिसले.

Ladki Bahin Yojana:
Sharad Pawar News: विधानसभेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी लागली कामाला; विदर्भात पक्ष बांधणीसाठी...

त्यांना तत्काळ मोहोळ मधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्या मृत्य झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनानंतर या घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या निधनामुळे देगाव गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर देगाव येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com