Sharad Pawar News: विधानसभेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी लागली कामाला; विदर्भात पक्ष बांधणीसाठी...

Maharashtra Assembly Election 2024 : एकमेकांच्या कार्यकार्त्यांची पळवापळवी सध्या जोरात सुरू आहे. आता कार्यकारिणी जाहीर करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पद आणि जबाबदाऱ्यांचे वाटप करून सर्वांना बांधून ठेवले आहे.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे नेते रणनीती आखत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्कलनिहाय पक्ष बांधणी केली जात आहे. नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील (Praveen Kunte Patil) टप्प्‍याटप्प्याने कार्यकारिणी जाहीर करीत आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला काटोल-नरखेड आणि हिंगणा हे दोन मतदारसंघ येणार आहेत. काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा संधी घेण्याची शक्यता आहे. त्यांचे पुत्र सलील देशमुख हेसुद्धा येथून लढण्यास इच्छुक आहेत. सध्या दोघेही चांगलेच कामाला लागले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य असलेले सलील देशमुख सध्या चांगलेच सक्रिय झाले आहेत. नरखेड येथील एमआयडीसी टप्पा दोनला हाय पॉवर कमेटीने मान्यता दिली असल्याने ते उत्साहित झाले आहे. सुमारे दीडशे हेक्टर जागेत एमआयडीचा विस्तार होणार आहे. हा मुद्दा राष्ट्रवादीसाठी निवडणुकीत महत्त्वाचा राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटात विभाजित झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते विखुरले आहेत. एकमेकांच्या कार्यकार्त्यांची पळवापळवी सध्या जोरात सुरू आहे. आता कार्यकारिणी जाहीर करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पद आणि जबाबदाऱ्यांचे वाटप करून सर्वांना बांधून ठेवले आहे.

NCP Sharad Pawar
Belapur Constituency Election 2024: 'बेलापूर'मध्ये भाजपच्या आजी-माजी आमदारामध्ये रस्सीखेच; कोण बाजी मारणार?

राष्ट्रवादीच्या कोट्यात काटोल आणि हिंगणा हे दोन मतदारसंघ आहेत. काटोलचे प्रतिनिधित्व माजी गृहमंत्री अनिल देशमुख करीत आहेत. हिंगणा मतदारसंघावरही राष्ट्रवादीचा दावा कायम आहे.

सध्या हिंगणा मतदारसंघात भाजपचे सागर मेघे आमदार आहेत. त्यांना पराभूत करण्याचा विडा माजी मंत्री सुनील केदार यांनी उचलला आहे. रमेश बंग येथे आधी आमदार होते. ते राज्यात मंत्रीसुद्धा होते. त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर पंधरा वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. या दोन्ही मतदारसंघाशिवाय कामठी, रामटेक, उमरेड आणि सावनेर मतदारसंघातही कार्यकारिणी जाहीर करून नियुक्त्या केल्या जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com