मुळा धरण भरले : अकरा दरवाजे उघडले

रविवारी सायंकाळी पाच वाजता मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे 5.4 सेंटीमीटरने उघडण्यात आले.
Mula Dam
Mula DamSarkarnama

Ahmednagar : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाच्या पूर्वसंध्येला काल (रविवारी) सायंकाळी पाच वाजता यंदाच्या हंगामात पहिल्यांदा मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे 5.4 सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणातून दोन हजार 160 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी मुळा नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले.

मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगरच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे विधिवत पूजन करून, धरणाचे अकरा वक्रीदरवाजे उघडण्यात आले. यावेळी जलसंपदाचे उपअभियंता शरद कांबळे, शाखाधिकारी बन्सी घोरपडे, कर्मचारी सलीम शेख, दिलीप कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ दुशिंग उपस्थित होते. आज (रविवारी) सायंकाळी पाच वाजता धरणसाठा 24 हजार 390 दशलक्ष घनफूट (93.80 टक्के) झाला.

Mula Dam
मुळा व निळवंडेच्या उपसा सिंचन सर्वेक्षणाला गडाखांची रसद : 2 कोटी 37 लाखांचा निधीची तरतूद

लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून 5 हजार 990 क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होती. धरण परिचालन सूचीनुसार 15 ऑगस्टपर्यंत 22 हजार 814 दशलक्ष घनफूट; तर, 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान 25 हजार 438 दशलक्ष घनफूट धरणसाठा स्थिर ठेवून, नव्याने जमा होणारे पाणी नदीपात्रात सोडावे लागते.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. धरणसाठा झपाट्याने वाढत आहे. मुळा जलाशय परिचालन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (रविवारी) सायंकाळी धरणातून विसर्ग सुरू केला आहे. टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार आह, असे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

Mula Dam
डॉ. नरेंद्र घुले यांनी मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी मागितला दहा कोटींचा निधी

दरम्यान, मुळा धरणाच्या वक्री दरवाजांवर आकर्षक रंगांचे प्रखर विद्युत झोत टाकण्यात आले आहेत. धरणाच्या सर्व अकरा दरवाजांद्वारे सोडलेल्या विसर्गाचे पाणी विविधरंगी प्रकाशात न्हावून उजळत आहे. अंधार पडल्यावर हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळणार आहे.

Mula Dam
Thorat Vs Vikhe : बाळासाहेब थोरात म्हणाले, जनताच कोणाचा कारभार कसा ते ठरवेल

मुळा धरण पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. धरणावर जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मागितला आहे. मुळा धरण प्रतिबंधित क्षेत्र आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. पर्यटकांनी धरणावर येऊ नये. अन्यथा, त्यांच्यावर शासन नियमानुसार फौजदारी कारवाई केली जाईल.

- सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com