Ambadas Danve On adjournment : विकासकामांच्या स्थगिती विरोधात न्यायालयात धाव घ्या, दानवेंचा सल्ला..

Shivsena (UBT) :महाविकास आघाडी सरकारच्या कामात खोडा घालण्याचा हा प्रकार होता, हे आता स्पष्ट झाले आहे.
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकारविरोधात अवमान याचिका दाखल होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. (Ambadas Danve On adjournment) याच्या सुनावणीपुर्वीच शिंदे-फडणवीस सरकारने याचिकेत नमूद विकासकामांवरील स्थगिती उठवली. खंडपीठाच्या दणक्यानंतर राज्य सरकारला जाग आल्याची टीका आता होऊ लागली आहे.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Minister Abdul Sattar : निवडणूक जवळ आली, हात जोडण्याची वेळ झाली..!

यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Shivsena) तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील सरकारने स्थगिती दिलेल्या विकासकामांची माहीती घेऊन न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मिळवावा, असा सल्लाही दिला आहे.

माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील स्थगिती असलेल्या कामावरील बंदी राज्यातील सरकारने उठवली नव्हती. (Marathwada) अवमान याचिका दाखल केल्यावर सुनावणीच्या अवघ्या एक दिवसापूर्वी कामांवरील ही स्थगिती उठवल्याची बातमी पाहिली. यातून हेच स्पष्ट होते की या कामात काही गैर असे नव्हते. केवळ महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) कामात खोडा घालण्याचा हा प्रकार होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

माझे आवाहन आहे अन्य लोकप्रतिनिधींना, ज्यांच्या मतदारसंघातील लोकोपयोगी कामे अशी जाणीवपूर्वक अडवली जात असतील, त्यांनी न्यायालयाचा हा निर्णय घेऊन पडताळवा आणि आपल्या आपल्या मंजूर कामांसाठी याचिका दाखल करून न्याय मिळवावा, असे आवाहनही दानवे यांनी या निमित्ताने केले.

तसेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्यानंतर आमदार पाटील यांच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना, प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज यांच्यावर खंडणीचा गुन्हा यावर देखील दानवे यांनी भाष्य केले. सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रतिनिधींचे चेले चपाटे अशी दहशत माजवत असतील तर यांच्यावर कोणती कारवाई 'सामान्यांचे सरकार' म्हणून सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत ? असा सवाल दानवे यांनी उपस्थितीत केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com