Nagapur Winter session : मराठा, धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक ठराव केंद्राला पाठवा..

Dipak Chavan Demand for reservation : आमदार दीपक चव्हाण यांची कायद्याच्या चौकटीत बसणारे, कोणावरही अन्याय न करणारे आरक्षण देण्याची मागणी.
MLA dipak chavan
MLA dipak chavanSarkarnama
Published on
Updated on

Nagapur Winter session : सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि कोणावरही अन्याय न करणारे आरक्षण द्यावे. तसेच अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सकारात्मक ठराव केंद्राला पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात आरक्षणविषयी बोलताना केली.

दीपक चव्हाण म्हणाले, सर्व समाजांबरोबरच मराठा समाजाचीही प्रगती झाली पाहिजे. मागील चाळीस वर्षापुर्वीचा विचार केला तर मराठा समाजातील साठ टक्के लोक प्रगत होते. ओबीसी समाजातील पंधरा ते वीस टक्के तर एससी समाजाची दोन-पाच टक्के प्रगती होती. इतर समाजाला आरक्षण मिळाल्याने पंचवीस टक्क्यांपर्यंत त्या समाजाची प्रगती झाली.

MLA dipak chavan
Eknath Khadse: खडसे आक्रमक, सलीम कुत्ता प्रकरणी गिरीश महाजनांची एसआयटी ...

ओबीसी समाज ३५ ते ४० टक्के प्रगतीवर पोहोचला. याउलट जो मराठा समाज ६० टक्के प्रगतीपथावर होता तो समाज ३० ते ४० टक्क्यांपर्यंत मागे आला. त्यांची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली. त्याला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांनाही मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे धनगर आरक्षणा (Dhangar reservation) च्या बाबतीत ज्या काही तांत्रिक चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात.

केंद्राच्या जात सूचीमध्ये धनगड आहे महाराष्ट्रामध्ये आपण धनगर असे म्हणतो. त्या प्रकारचा ठराव करून तो केंद्राकडे पाठवावा. तसेच ओबीसी जनमोर्चा, विमुक्त जाती, भटक्या जाती विमुक्त जमाती, मुस्लिम, बंजारा याही समाजाची आरक्षणाची मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच महादेव कोळी समाजास अनुसूचित जातीचे दाखले मिळावेत ही मागणी ही शासनाने पूर्ण करावी. आरक्षणासाठी जात हा एकमेव निकष आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली तर सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

MLA dipak chavan
Ajit Pawar News : नाशिक लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचाही दावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com