Sujay Vikhe Patil News : रोहितदादा लोकसभा लढवतील, तर मला जास्त तयारी करावी लागेल; सुजय विखेंना धसका

Nagar Politics : राम शिंदे आणि नीलेश लंके हे विखेविरोधक असल्याचे चित्र अहमदनगर जिल्ह्यात तयार झाले होते.
Sujay Vikhe, Rohit Pawar
Sujay Vikhe, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagar : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोण लढविणार, याबाबत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे नाव पुढे आले आहे. खासदारकीच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या विरोधात रोहित पवार यांना उतरविणार असल्याची चर्चा झाली. सुजय विखे पाटलांना याबाबत विचारलं असता, त्यांनी मिश्किलपणे टोला लगावला.

सुजय विखे पाटील म्हणाले, "रोहित पवार यांना विचारून मी चर्चा करणार आहे. चर्चा करून विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. लोकसभा निवडणूक ते लढविणार की नाही, याबाबत त्यांना विचारतो, त्यांच्या मनात काय चाललं आहे. त्या अनुषंगाने तयारीला लागतो. ते निवडणूक लढविणार असतील, तर मला जास्त तयारी करावी लागेल. आम्ही चर्चा करून ठरवू," ते माध्यमांशी बोलत होते.

Sujay Vikhe, Rohit Pawar
Hasan Mushrif News : श्रेयवादावरून दोन मित्रांमध्ये जुंपली; मुश्रीफांनी पाइपलाइनचं श्रेय अजितदादांना दिले

सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सुजय विखे म्हणाले, "सध्या 'मित्र वैरी'आणि 'वैरी मित्र'असे सर्व जण समान झालेले आहेत. सर्वजण आपापल्या मित्राच्या शोधात आहेत. नवीन मित्र शोधत आहेत. अशा मित्रांच्या सानिध्यात राहून नवीन राजकारण करता येत असेल, तर करूया,"

नगर पारनेर तालुक्याचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी नुकताच एकत्रित प्रवास करीत मोहटादेवीचे दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते, तर राष्ट्रवादीकडून आमदार नीलेश लंके यांचेही नाव चर्चेत होते. त्यामुळे आमदार राम शिंदे आणि नीलेश लंके हे विखे विरोधक असल्याचे चित्र नगर जिल्ह्यात तयार झाले होते.

तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून ...

या पार्श्वभूमीवर या दोघांचा एकत्रित प्रवास हा नगर जिल्ह्यात चांगला चर्चेचा विषय झाला होता. यावर सुजय विखे पाटील यांनी आपल्या शैलीत चांगलाच टोला लगावला. "टीव्हीच्या माध्यमातून मला त्या दोघांचा दौरा पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेने टीव्हीद्वारे हे सर्व पाहिले की महायुती किती बळकट आहे. आज महायुती यशस्वी झाली असेल ती नगर जिल्ह्यात झाली असे चित्र आहे आणि म्हणून अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी मोहटा देवीच्या पावन भूमीमध्ये झाली म्हणून मला पूर्णपणे विश्वास आहे, की भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा उमेदवार तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार होता तो आता अधिक मताधिक्याने निवडून येईल याची दाट शक्यता निर्माण झाली आहे," असे विखे म्हणाले.

Sujay Vikhe, Rohit Pawar
Raksha Khadse News : 'रावेर' बाबत रक्षा खडसेंचं मोठ विधान; म्हणाल्या, "एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्यानं..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com