Jalgaon Latest News : जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे. या मतदारसंघाच्या खासदार भाजपच्या रक्षा खडसे आहेत. त्या दोनदा या मतदारसंघातून निवडून आल्या असून, तिसऱ्यांदा त्या लढण्याची तयारी करीत आहेत. मात्र, या वेळी त्यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. मात्र, रक्षा खडसे यांनी आपल्या उमेदवारीबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने रक्षा खडसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे हे रावेरमधून रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सून विरोधात सासरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसेंनी भाष्य केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी एकनाथ खडसेंची सून म्हणून माझी ओळख ठेवलेली नाही. रक्षा खडसे हे नाव लोकांमध्ये आज पोहोचलेलं आहे. लोकांसाठी मी काम करतेय. खरंतर खडसे हे नाव माझ्या पाठीमागे आहे. एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्याने मला जर लोक डावलत असतील, तर हे चुकीचं आहे. त्यामुळेच रावेर लोकसभेच्या जागेला महत्त्व आलं आहे. माझ्यावरही आरोप केला जातोय की मी पक्षांतर करेन, पण आम्ही जरी एक असलो तरी एकनाथ खडसे यांचा पक्ष आज बदललेला आहे. माझा पक्ष वेगळा आहे. मी भाजपमध्येच आहे, असं रक्षा खडसे यांनी ठामपणे सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेल्या आणि पक्षातर्फे उमेदवारीबाबत चर्चा सुरू असतानाच आता या मतदारसंघात मित्र पक्ष अजित पवार गटाने आपला दावा केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या मतदारसंघात आमच्याकडे हमखास निवडून येणारा सक्षम उमेदवार असल्याचा दावा केला आहे.
या मतदारसंघातून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता राज्यात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अजित पवार गटाने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, आमच्याकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार आहे, त्या बळावरच आम्ही दावा करीत आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांच्याकडे आम्ही प्रस्ताव दिला आहे. ते जागावाटपात त्याबाबत चर्चा करतील, त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.