पंढरपूर : पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती माजी उपनगरध्यक्ष नागेश भोसले यांनी आज (ता. ८ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे भोसले हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हा भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मोठा धक्का असून आगामी नगरपरिषद निवडणुकीची गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. (Nagesh Bhosale, a supporter of Prashant Paricharak, meet Sharad Pawar)
दरम्यान ही सदिच्छा भेट होती. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे भोसले यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर भोसले-पवार यांची भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या साडेसात वर्षांपासून साधना भोसले या नगराध्यक्ष होत्या. या काळात नागेश भोसले यांनी पंढरपूर शहरात आपली स्वतंत्रपणे राजकीय ओळख निर्माण केली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागेश भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. त्याच वेळी नागेश भोसले हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती.
सध्या नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय गाठीभोटी आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी परिचारक गटाच्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर परिचारकांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले नागेश भोसले यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील काही दिवसांपासून भोसले आणि परिचारक यांच्यामध्ये काही प्रमाणात विसंवाद सुुरु आहे. त्यामुळे भोसले यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असवा अशीही चर्चा सुरु आहे.
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी परिचारक गटाच्या विरोधात भालके-काळे यांच्याबरोबरच मनसेनेही तयारी सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून परिचारक विरोध गटाच्या जोर बैठका सुरु आहेत. विरोधकांना शह देण्यासाठी परिचारक गटांने ही रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीपूर्वीच पंढरपुरात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यामुळे ही सदिच्छा भेट होती. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे प्रशांत परिचारकांना सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधक जाणूनबुजून चर्चा घडवून आणत आहेत, असे नागेश भोसले यांनी पवारांच्या भेटीनंतर सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.