पवारांना देवेंद्र फडणवीसांना संपवायचे आहे...व्हिडिओमधील संभाषणाने खळबळ!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाच्या माध्यमातून कसे कट रचत आहे, याचा भांडाफोड क्लिपआधारे केला.
Devendra Fadnavis-sharad Pawar
Devendra Fadnavis-sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाच्या माध्यमातून कसे कट रचत आहे, याचा भांडाफोड याबाबतचे व्हिडिओ आणि ऑडिओमधील संवादाच्या क्लिपआधारे केला. या क्लिपमध्ये प्रवीण चव्हाण यांनी ‘शरद पवारांना (Sharad Pawar) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे आहे,’ असा उल्लेख केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar wants to finish Devendra Fadnavis's political career)

एक कथा : महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना, असे टायटलखाली देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष सरकारी वकिलांचे व्हिडिओचे संभाषण असलेला एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे. त्यात अनेक विषयांवर चव्हाण यांनी भाष्य केल्याचे व्हिडीओमधून दिसून येत आहे.

Devendra Fadnavis-sharad Pawar
गिरीश महाजनांना मोका लावा, फडणवीस, मुनगंटीवार यांना अडकवा... : असा ठरला प्लॅन

व्हिडिओ क्रमांक १३ मध्ये शरद पवारांसंदर्भात चव्हाण यांनी भाष्य केले आहे. तो संवाद असा ः साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण, शरद पवार यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना. १ लाख १ टक्के, गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्या वर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.

(व्हीडिओ ८) ः सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला. पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपीला रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजीचा फोन आला. सीएम, अजितदादा/वळसे पाटील/एसीएस, डीजी होते. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले. सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी पवारसाहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे पवार साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हलायचे नाही.

Devendra Fadnavis-sharad Pawar
अजित पवार सपोर्ट करत नाहीत.. बडे साब सब देख रहे है! : फडणविसांच्या आरोपांनी खळबळ

(व्हीडिओ ९) ः अजित पवार सपोर्ट करीत नाहीत. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकाऱ्यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.

(व्हीडिओ ११) ः साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. एका दिवसात एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वतः अभ्यास करून कलमं लावली. अनेक कलमं लावली. पण त्यांनी परेच्या पर गहाळ केली.

(व्हीडिओ २२) ः कुठल्यातरी मॅडमशी संवाद- पवारसाहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो. मी, जयंत पाटील असे अजितदादांकडे जातो. मी स्वतः येणार नाही. कारण, मी आलो तर मी राष्ट्रवादीचा वकील आहे, याचा पुरावा मिळेल.

Devendra Fadnavis-sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात उद्योग रथयात्रा काढणार!

(व्हीडिओ २५) ः कोणत्या दिवशी किडनॅप केले ते सांगा, असा प्रश्न विचारला तर सांगायचे पहिल्या आठवड्यात. तारीख कशाला सांगायची? काही भाग गिरीश महाजनला कळला, तर त्याने एफआयआर कॉपी मागवून घेतली. स्टे घेतला. आता प्रयत्न करतात. मी कधी कुठे दिसतो का? मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशीरा. माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे पवारसाहेबांच्या सांगण्यावरून होते आहे.

(व्हीडिओ २६ ए) (अनिल गोटे यांच्याशी कॉल) ः ते संजय राऊतने साडेतीन नेते सांगितले ते कोण? तावडे/गरीश महाजन/रावल/देवेंद्र फडणवीस/रणजित पाटील सर्व फाईली आहेत आपल्याकडे. झेरॉक्स देतो. कुठे भेटणार? तीच आरबीआयजवळील ३०२ नंबरची खोली. साहेबांची इच्छा आहे, करू आपण सगळे, खचून नका जाऊ. संजय राऊतांची वेळ घ्या, मी सोबत येतो. आपल्याजवळ सगळे आहे, करू आपण सगळे. साहेबांशी माझे बोलणे झाले आहे. साहेब म्हणाले मी सांगतो. सीएम फाऊंडेशनचा गुन्हा आपण सोलापूर ग्रामीणमध्ये करतोय, साहेबांचे बोलणे झाले आहे.

Devendra Fadnavis-sharad Pawar
खुद्द शरद पवारच म्हणाले,‘इथेही पवारांचेच राज्य दिसतेय!’

(ऑडिओ १) ः पवार साहेबांची वेळ घ्या, तोवर काही शक्य नाही. अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले. वळसे काहीच करीत नाही. आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते. कोर्टात काय भूमिका मांडायची, हे तेच ठरवतात. ते म्हणतील ते ठरते.

(व्हीडिओ ३२-जी-एच) ः वकिल : साहेबांनी नगराळेला सांगितले, जयंत पाटील यांनी सांगितले. पण, ऐकतच नाही, काय करायचे? साहेब म्हणाले, तुला जे जे पाहिजे ते ते कर. फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो, तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला. वकिल : आपले जजेस आणायचे. कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com