Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी शिवेंद्रसिंहराजे आक्रमक; 'मराठा समाजाचा केवळ राजकीय वापर झाला...'

Shivendraraje Bhosale : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका मांडली.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session 2023 : "सरकारने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे हे आरक्षण मिळेल याची खात्री आहे. आजपर्यंत मराठा समाजात अनेक मोठे नेते झाले.

पण, समाज मोठा असल्याने त्याचा केवळ राजकीय कारणांसाठी वापर झाला. त्यामुळे हा समाज मागे पडायला लागला आहे. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे", अशी आक्रमक भूमिका सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिवेशनात मांडली.

नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन सध्या चर्चा सुरु झाली असून मंगळवारी सातारा, जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक होत आपली भूमिका मांडली.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, "मराठा समाज हा गावगाड्यातील प्रमुख समाज असून या समाजाने आजपर्यंत जबाबदारीची भूमिका बजावण्याचे काम केले. इतिहास पाहता या समाजाने हा संरक्षण करण्याचे काम केले असून लढवय्या समाज म्हणून या समाजाची ओळख आहे. मराठा समाजातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे, त्यांच्याकडे जमीन आहे.

तो श्रीमंत आहे, असे या समाजाकडे पाहिले जात आहे. खरच ही परिस्थिती आहे का, या समाजाची नेमकी परिस्थिती विचारात घेणे गरजेचे आहे. जो समाज रक्षणासाठी लढला. त्याची चुनूक पानिपतचा इतिहास व छत्रपतींच्या इतिहासात पहायला मिळते. यातूनच या समाजाचे कर्तृत्व पहायला मिळते", असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivendraraje Bhosale
Jashraj Patil News: अपघातग्रस्त रिक्षा काढण्यासाठी आमदारपुत्र उतरले खड्ड्यात!

"कोपर्डीच्या घटनेमध्ये आपल्या आई बहिणींचे संरक्षण हा समाज करु शकला नाही. आजपर्यंत या समाजाचे मोर्चे अतिशय शांतते निघाले कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अशा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. समाजाकडे शेती असली तरी शेतीतून उत्पन्न किती मिळते हे आपण सर्वजण जानता. घरातील विभागण्यावरुन जमिनीचे तुकडे होत आहेत, त्यामुळे अल्प प्रमाणात शेती राहिली आहे.

आज मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी मोर्चे निघाले सर्व संविधानिक बाजू बघून त्यावेळी टिकावू व कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले. उच्च न्यायालयात आरक्षण टिकलेही. पण नंतरच्या काळात हे आरक्षण का गेले, कसे गेले, कुणामुळे गेलं हे सर्व महाराष्ट्रातील जनतेपुढे आले पाहिजे", असं शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

"या प्रस्तावाच्या माध्यमातून मी मागणी करतो की, आरक्षणामुळे राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.सध्या एक समाज दुसऱ्या समाजाकडे वेगळ्या नजरेने बघत असताना आपले कोणी काढून नेत नाही ना, आपल्यावर अन्याय होणार नाही ना, अशा पद्धतीने पाहिले जात आहे. शासनानेही या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी (eknath shinde) तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे हे आरक्षण मिळेल याची खात्री आहे. केवळ हे सरकारच आरक्षण देऊ शकेल. मराठा समाजात अनेक मोठे नेते झाले पण, समाज मोठा असल्याने त्याचा केवळ राजकीय कारणांसाठी वापर झाला. त्यामुळे हा समाज मागे पडायला लागला आहे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणात या समाजाची मुले मागे पडत आहेत.

माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण मिळावे. तसेच ते समाजातील गरजूंना मिळावे. कोणाचेही काढून न घेता इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे, जेणे करुन ते पुढे कायद्याने टिकावे", अशी अपेक्षा आमदार भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी मांडली.

(Edited by - Ganesh Thombare)

Shivendraraje Bhosale
Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनात हिंगोली पोलिसांसाठी धावले संतोष बांगर! वेळेत जेवण न मिळाल्याने...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com