Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनात हिंगोली पोलिसांसाठी धावले संतोष बांगर! वेळेत जेवण न मिळाल्याने...

Santosh Bangar News: संतोष बांगर यांचे पोलिसांनी आभार मानले आहे.
Santosh Bangar News
Santosh Bangar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यासाठी राज्यभरातील पोलिस बंदोबस्त नागपूर मध्ये बोलावण्यात आला आहे. अधिवेशना दरम्यान विविध संघटनांचे मोर्चे व आंदोलने सुरू असल्याने दिवसभर बंदोबस्त करून रात्रीच्या वेळी पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था न झाल्याने हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी नागपूर मध्ये हिंगोली जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी स्वखर्चातून जेवण दिले.

पोलिसांसाठी जेवण्याची व्यवस्था करून संतोष बांगर यांनी पोलिसांना जेवण वाढले. संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतोष बांगर यांचे पोलिसांनी आभार मानले आहे.

Santosh Bangar News
Prithviraj Chavan: भाजप नेत्याचा पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप; सरकार अन् स्थानिकांमध्ये समन्वय न ठेवल्याने...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा काल (मंगळवारी) नागपुरात समारोप झाला. यानंतर रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी विधानभवन परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं.

यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स कार्यकर्त्यांनी तोडले.जबरदस्तीने आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी लाठीमार करत रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं होते.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात सादर केलेल्या 55 हजार 520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोहोचवण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्राच्या योजनांच्या मॅचिंग ग्रॅंटचाही पुरवणी मागण्यांमध्ये समावेश असल्याचे अजित पवार यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात सांगितले. पुरवणी मागण्यांमुळे वाढलेली महसुली व राजकोषीय तूट वर्षअखेरीस उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून आणि प्रत्यक्ष खर्चावर नियंत्रण ठेवून कमी करण्यात येईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

Santosh Bangar News
Supriya Sule News: सुप्रियाताईंनी शेअर केली संघर्ष करणाऱ्या बाबांची गोष्ट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com