सोनई ( जि. अहमदनगर) - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांनी लिहिलेल्या 'मनातला पाऊस' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यशवंतराव गडाख यांच्या कार्याचे कौतुक केले. ( Nagraj Manjule said, Gadakh wrote .. People also read when written .. )
या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार विनायक राऊत, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, डॉ. पी.डी. पाटील, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, साहित्यिक अंबरीश मिश्र, विश्वास पाटील, आमदार दीपक केसरकर, आमदार कैलास घाडगे-पाटील उपस्थित होते.
नागराज मंजुळे म्हणाले की, मनातल्या भावना कागदावर टिपून साहित्य निर्मिती करणाराच लेखक लेखक असतो असे अजिबात नाही. राजकीय धावपळीत जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी वाचलेली माणसे, नजरेला भावलेला निसर्ग आणि मनातील प्रश्नांना लिखानाची वाट दाखवत सुंदर साहित्याला जन्म दिला.हे नाते अनेक पिढ्यांना आपले वाटेल असेच आहे, असे विचार मंजुळे यांनी व्यक्त केले.
सुसंस्कृत राजकारणी म्हणून नाव असलेल्या यशवंतराव गडाखांनी साहित्य क्षेत्रातही संवेदनशील राहुन लिखानातील नेमकेपणा जपला आहे, असे सांगून मंजुळे यांनी स्वताःच्या शालेय जीवनातील प्रसंग सांगितले. यश एका रात्रीतून मिळत नाही त्यासाठी अनेक ठेचा सहन कराव्या लागतात असे सांगितले.
मंत्री भुजबळ यांनी आपल्या भाषणात गडाख यांनी राजकारण कमी व समाजकारण जास्त करीत सोनई गावाचे सोने केले आहे. गावाचे गावपण त्यांच्या विचार आणि आचरणात आहे असे सांगितले.
साहित्यिक मिश्र, उल्हास पवार, पत्रकार खांडेकर यांची भाषणे झाली. ऋतुरंग प्रकाशनचे अरुण शेवते यांनी गडाख यांच्या अर्धविराम, अंतरवेध, सहवास, माझे संचित व आज प्रकाशन झालेल्या 'मनातला पाऊस' पुस्तकांची माहिती दिली. डॉ. सुभाष देवढे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शर्वरी शेवते यांनी आभार मानले.
मनसुखशेठ चमकले..
यशवंतराव गडाख यांनी आपल्या 'मनातला पाऊस' या पुस्तकात सोनईतील महावीर पेठेत राहणाऱ्या स्व. मनसुखशेठ बंग यांना स्थान दिले आहे. भोळसर असलेल्या या व्यक्तिमत्वाची नेत्याप्रती असलेली निष्ठा व त्याच्यातला ग्रामीण शहाणपणा गडाखांनी लेखातून व्यक्त केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.