पुणतांबे येथील शेतकरी आंदोलकांना जाऊन नाना पटोले, बाळासाहेब थोरात भेटले : म्हणाले...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी काँग्रेसच्या शिबिरातून वेळ काढत थेट पुणतांब्यात आंदोलक शेतकऱ्यांना जाऊन भेटले.
Balasaheb Thorat and Nana Patole
Balasaheb Thorat and Nana PatoleSarkarnama

अहमदनगर - राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर पुणतांबे येथील शेतकऱ्यांचे आंदोलन दोन दिवसांपासून सुरू आहे. काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर शिर्डी येथे सुरू आहे. शिर्डी व पुणतांबे दोन्ही ठिकाणे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी काँग्रेसच्या शिबिरातून वेळ काढत थेट पुणतांब्यात आंदोलक शेतकऱ्यांना जाऊन भेटले. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. ( Nana Patole and Balasaheb Thorat met the farmers in Puntambe )

या प्रसंगी नाना पटोले म्हणाले, पुणतांबे हे ऐतिहासिक गाव आहे. येथे पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन झाले होते. शिर्डीत काँग्रेसचे शिबिर सुरू आहे. ते सोडून आम्ही या ठिकाणी आलो कारण आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे.

Balasaheb Thorat and Nana Patole
नाना पटोले म्हणाले, संकटात असलेल्या हिमालयाला सह्याद्री वाचविण्यासाठी जाणार...

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर ठराव होतात. मात्र अनेक प्रश्न सुटत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतो. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे तरुण बेरोजगार होतो आहे. अनेकांनी नोकरीची आस सोडली आहे. अडीच कोटींच्या नोकऱ्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या. 3 काळ्या कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन केले. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे गेले नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटले. कृषी प्रधान देशात पंतप्रधानाने अस बोलणे योग्य नाही. हा तोच नाना पटोले आहे, ज्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खासदारकी सोडली, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

पाणी संपले की वीज निर्मिती बंद झाली. आता कोळश्यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही महाग असते. त्यामुळे निसर्गावर आधारित वीज आणि सौरऊर्जा यावर भर दिला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात परिवर्तन आणू. आम्ही देणारी व्यवस्था निर्माण करू. 10-15 जूनपर्यंत आम्ही असा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडणार असल्याचे, आश्वासन नाना पटोले यांनी दिले.

Balasaheb Thorat and Nana Patole
बाळासाहेब थोरात म्हणाले, विरोधकांचा छळ करणे हे भाजपचे धोरण...

बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसच्या शिबिराच्या निमित्ताने अनेक नेते आणि मंत्री शिर्डीत आहेत. शेजारी आंदोलन सुरू असताना आपण न जाण, योग्य नाही. शेतकरी आंदोलन म्हटलं की नाना पटोले उभे राहतात. आंदोलन होत असत मात्र त्यांच्याशी बोलणे संवाद साधने हे कर्तव्य आहे. इथे येताना मी माझे ओळखपत्र खिशात टाकले. इथे आपण शेतकरी आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले की, उदयपूरमध्ये शेतकऱ्यांवर चर्चा झाली आणि शिर्डीतील कालच्या चर्चेत देखील यावर चर्चा झाली. मी शिर्डीत नसतो तरी इथे आलो असतो. कर्जमाफीचा आम्ही शब्द दिला. त्यासाठी जिल्हा बँकेंना साडे पंधराशे कोटींची रक्कम देण्यात आली. 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली. आम्ही सर्वांना कर्जमाफी करण्याची तयारी केली मात्र कोरोनामुळे सगळे थांबले. नियमित कर्ज फेकणाऱ्यांना पैसे मिळणार. 15 लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat and Nana Patole
रोहित पवारांचे पडळकरांना सडेतोड उत्तर : म्हणाले...

कोरोनात सरकारने 10 लाख लीटर दूध सरकारने विकत घेतले म्हणून जमले. समृद्धी महामार्गात काही गावांच्या जमिनी अडकल्या आहेत. ते देखील मी सोडवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शेतात तोडणी न झालेला ऊस सरकारकडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. उसाप्रमाणे दुधाला भाव देण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र केंद्राने गहू व कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com