Pune drug Racket : पुण्यातल्या ड्रग रॅकेटचे गुजरात कनेक्शन आहे का? नाना पटोलेंचा सवाल

The question of various factions : राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडेच निघाले. सरकार भ्रष्ट असून फक्त तिजोरी लुटण्यात व्यस्त.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पुण्यात तीन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपचे 'आका' यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे काम करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यात अमली पदार्थांचा काळा धंदा जोरात सुरू आहे. याआधी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर या ठिकाणी अमली पदार्थांचे मोठे साठे सापडले होते. पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली, ड्रगमाफिया मात्र मोकाटच राहिले म्हणूनच पुण्यात 4 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole
Pune Politics News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला धमकी; जगताप यांची पोलिसांत धाव

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडेच निघाले आहेत. विधानसभेत राज्याचा एक वरिष्ठ मंत्रीच त्यांना धमक्या येत असल्याचे सांगतात, यावरून कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, हे लक्षात येते. हे सरकार भ्रष्ट असून, फक्त तिजोरी लुटण्यात व्यस्त आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी या वेळी केला.

ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा ॲम्ब्युलन्सचे कंत्राट...

ॲम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या BVG कंपनीला देशभरातील 7 राज्यांनी ब्लॅकलिस्ट केले आहे, या कंपनीला काम देऊ नये असे आदेश आहेत. BVG कडे जुन्या व कालबाह्य झालेल्या ॲम्ब्युलन्स आहेत. कोरोना काळात या कंपनीला मुदतवाढ दिली होती, त्यानंतर नवीन टेंडर काढून दुसऱ्या कंपनीला कंत्राट द्यायला पाहिजे होते.

परंतु महायुती सरकारने पुन्हा BVG या कंपनीला कंत्राट दिले आहे. BVG कंपनीवर एवढी मेहेरबानी दाखवायला या कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का? असा प्रश्न विचारत या ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

R

Nana Patole
Loksabha Election 2024 : गावबंदीच्या बॅनरवरून दीपक केसरकर संतापले; राणे समर्थक 'या' आमदारावर घसरले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com