Snehalata Kolhe : माजी आमदारांना लिटिल चॅम्पस् गौरीसोबत काढायचायं फोटो...

Gauri Pagare News : कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
Snehalata Kolhe ,  Gauri Pagare
Snehalata Kolhe , Gauri Pagare Sarkarnama

Nanar : कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावची गौरी पगारे ही महाराष्ट्राची लाडकी गायिका ठरली आहे. गौरीच्या यशाबाबत माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी कौतुक केलं आहे. कोल्हे यांनी गौरीचे अभिनंदन केले असून हा विजय आपल्या कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

"एका विवाह सोहळ्यात गौरी माझ्याकडे आली आणि ताई मला तुमच्या सोबत एक फोटो काढायचा आहेस असे ती म्हणाली होती मात्र, आज तिच्या या प्रेरणादायी विजयाने मला तिच्यासोबत एक फोटो काढायचा आहे, इतकी गौरी कर्तुत्वाने आणि कलेने मोठी झाली आहे," अशा शब्दात कोल्हेंनी गौरीचं कौतुक केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Snehalata Kolhe ,  Gauri Pagare
Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांचा सल्ला जरांगेंना मान्य; पण...

ज्येष्ठ संगीतकार, गायक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला महाविजेती म्हणून घोषित करण्यात आले आहे. गौरी अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आली आहे. लहान वयातच गौरीने एक मोठी गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार झाले आहे.

संजीवनी उद्योग समूह,बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे यांनीही गौरीचे अभिनंदन केले आहे.सर्व स्तरातून गौरीवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. गौरीला मंगेशकर कुटुंबीयांनी ट्रॉफी म्हणून चांदीची वीणा भेट दिली आहे.

Snehalata Kolhe ,  Gauri Pagare
Prithviraj Chavan : चव्हाणांचा रोख अजित पवारांकडे? म्हणाले, "दररोज आत्मक्लेश..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com