Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांचा सल्ला जरांगेंना मान्य; पण...

Maratha Reservation: कुणालाही अटक करू नका.लोकांवर लक्ष ठेवा

prakash ambedkar,  manoj jarange
prakash ambedkar, manoj jarangeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : "सोनिया गांधींनी जी चूक केली ती तुम्ही करू नका," असा सल्ला 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना शनिवारी दिला. त्यावर जरांगेंनी भाष्य केले आहे. "आंबेडकरांचा सल्ला मला मान्य आहे. पण मला सल्लागार नाहीत, सल्लागार माझ्याकडे टिकत नाहीत," असे जरांगे पाटील म्हणाले.

संविधानदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवाजी पार्क येथे संविधान सन्मान सभेचं शनिवारी आयोजन केले होते. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांना सल्ला दिला होता. त्यावर जरांगेंनी भाष्य केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आमच्याशी दगाफटका करू नका..

"आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांनी शांत राहावे. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारने कायदा करावा, मुख्यमंत्री आरक्षण देतील. सरकारला विनंती आहे, आमच्याशी दगाफटका करू नका, कुणालाही अटक करू नका.लोकांवर लक्ष ठेवा पण आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही," असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"लोकशाहीत प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे. आमच्या आंदोलकांना नाहक नोटिसा देऊ नका. लोकांमध्ये नाराजी होईल असं काही करू नका, साखळी उपोषण करणाऱ्यांना नोटिसा देऊ नका,"असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते आंबेडकर

मराठा आरक्षणावर बोलताना आंबेडकर म्हणाले की जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाही, जरांगेंनी त्यांच्या सल्लागारांचे ऐकू नये. जी चूक सोनिया गांधी यांनी केली होती. ती चुक त्यांनी जरांगेंनी करु नये. सोनिया गांधींनी 'मौत का सौदागर' असे विधान केले होते.


prakash ambedkar,  manoj jarange
Manoj Jarange : मध्यरात्रीनंतरही का होत आहेत जरांगे पाटलांच्या सभा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com