Prithviraj Chavan : चव्हाणांचा रोख अजित पवारांकडे? म्हणाले, "दररोज आत्मक्लेश..."

Yashwantrao Chavan Death Anniversary : आत्मक्लेशसाठी नेत्यांची रीघ लागेल का? असा प्रश्न विचारला असता...
Yashwantrao Chavan Death Anniversary  News
Yashwantrao Chavan Death Anniversary NewsSarkarnama
Published on
Updated on

विशाल वामनराव पाटील

karad : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून निवडणुका जवळ आल्याने आता नेत्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन आत्मक्लेश करावा लागेल का? आणि आत्मक्लेशसाठी नेत्यांची रीघ लागेल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पृथ्वीराज चव्हाण यांनी दररोज सकाळ-संध्याकाळ आत्मक्लेश करावा लागेल, असा खोचक टोला लगावला आहे.

मोठ्या हास्यकल्लोळात चव्हाण म्हणाले, "नुसतं समाधीवर येऊन आत्मक्लेश करून भागणार नाही. तर दररोज सकाळ- संध्याकाळ समाधीवर येऊन आत्मक्लेश केला पाहिजे," चव्हाण यांच्या या वक्तव्याचा हा रोख अजित पवारांकडे होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yashwantrao Chavan Death Anniversary  News
Manoj Jarange : मध्यरात्रीनंतरही का होत आहेत जरांगे पाटलांच्या सभा?

अजितदादांचा प्रीतीसंगम घाटावर आत्मक्लेश का?

इंदापूरजवळ एका जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या पाणी प्रश्नावर खालच्या भाषेत विधान केलं होतं. यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. शरद पवारांनीही अजित पवारांचे कान उपटले होते. यानंतर उपरती झाल्याने अखेर अजित पवार यांनी आत्मक्लेश केला होता. यशवंतरावांच्या समाधीस्थळी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आत्मक्लेश अजितदादांनी केला होता. या घटनेची आठवण चव्हाणांच्या विधानामुळे उपस्थितांना झाली.

सत्ताधाऱ्यांचे कान टोचले

यशवंतराव चव्हाण यांचा काल (शनिवारी) स्मृतीदिन होता. यानिमित्ताने अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक राजकीय नेते, मंत्री हे कराड येथील समाधी स्थळावर (प्रीतिसंगम) जाऊन त्यांच्या स्मृतीस वंदन केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रीतिसंगमावर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे कान टोचले.

"यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर सत्ताधाऱ्यांनी एक दिवस नाही तर दररोज सकाळ-संध्याकाळ येवून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," अशा शब्दात चव्हाणांनी टोला लगावला. खासदार सुप्रिया सुळे, मंत्री शंभुराज देसाई आदींनी शनिवारी यशवंतरावांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Yashwantrao Chavan Death Anniversary  News
Nashik News : नाशिककर तहानलेले असतानाही पाणी का सोडले, सत्ताधारी गप्प कसे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com