Narendra Modi On Congress : 'कर्नाटक पॅटर्न'वरून मोदींचा काँग्रेसला कडक इशारा; 'मी जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीत...'

BJP Vs Congress Politics : भारताचे संविधान धर्माच्या आधारावर आरक्षणाला मनाई करते. आता ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. काँग्रेसने मात्र कर्नाटकमध्ये सर्व मुस्लिमांना एका रात्रीत ओबीसी म्हणून घोषित केले.
Narendra Modi
Narendra Modiएोीकोीलोसो

Satara Political News : कर्नाटकमध्ये सरकार आल्यानंतर काँग्रेसने तेथील मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून सतत केला जात आहे. हा मुद्दा आधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यातील सभेतून काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. कर्नाटकमध्ये सत्ता आल्यानंतर काँग्रेसने फतवा काढून एका रात्रीतच सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. आता तोच फॉर्म्युला देशभर राबवण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचा आरोपही मोदींनी केला. मोदींच्या या आरोपांमुळे काँग्रेस काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे. Congress give OBC reservation Muslim in Karnataka.

नरेंद्र मोदी Narendra Modi म्हणाले, आमच्या सरकारने ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला. काँग्रेसचे इरादे मात्र काही वेगळेच असल्याचे कर्नाटकमध्ये दिसून येत आहेत. भारताचे संविधान धर्माच्या आधारावर आरक्षणाला मनाई करते. आंबेडकरांनी धर्मावरून आरक्षणास मनाई केली आहे. आता ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. काँग्रेसने मात्र कर्नाटकमध्ये सर्व मुस्लिमांना एका रात्रीत ओबीसी म्हणून घोषित केले, असा आरोप मोदींनी केला.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने Congress फतवा काढून एका रात्रीतच ओबीसीच्या 27 टक्क्यांवर डाका घातला. त्यात मुस्लिमांना सर्वात जास्त स्थान दिले. आता काँग्रेसचा संविधान बदलून पूर्ण देशभर हाच फॉर्म्युला लागू करण्याचा डाव आहे. काँग्रेसने एकच लक्षात ठेवावे, काँग्रेस नेत्यांनी कान उघडून ऐका, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा तुमचा प्रयत्न, संविधानाच्या नावावर आरक्षण बदलण्याचे तुमचे प्रयत्न पूर्ण होणार नाही, असा इशाराच नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Narendra Modi
Narendra Modi Satara : देशात लवकरच मोठं कांड होणार? PM मोदी नेमके काय म्हणाले?

देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य झालेल्या देशाला काँग्रेसने गुलामीतच जखडून ठेवले. काँग्रेसने 70 वर्षांतील 60 वर्षे देशात राज्य केले. मात्र, बाबासाहेबांचे संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. आम्ही 370 कलम हटवले आणि देशात एकता निर्माण केली. 370 हटवण्याची गॅरंटी दिली होती, ती पूर्ण केली. आता तेथील दलित,ओबीसी, आदिवासींना, महिलांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे, असेही नरेंद्र मोदींनी या वेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Narendra Modi
Vasant More News : वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांना मिळाले 'हे' चिन्ह !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com