Narendra Modi News : 'भाजपचा वारू आता कोणी रोखू शकत नाही', कोणी केला हा दावा

BJP will win more than 300 seats in the country : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय सिंह मिश्रा
Ajay Mishra
Ajay MishraSarkarnama
Published on
Updated on

Phaltan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा जगात सन्मान वाढविण्याचे काम केले असून ज्या भागात पोहचू शकत नाही अशा भागातही रस्ते, आरोग्य सुविधा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपचा वारू आता कोणी रोखू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत 300 हून अधिक जागा भाजप जिंकेलच पण महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागा पण जिंकेल असा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय सिंह मिश्रा यांनी केला.

इरिगेशन बंगला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मिश्रा बोलत होते. यावेळी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सचिन कांबळे, अमोल सस्ते, बजरंग गावडे आदी उपस्थित होते. गेल्या साडेनऊ वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा तळागाळात पोहचवली आहे. नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. आमच्या सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत यात्रा काढली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajay Mishra
Jyoti Mete : 'लढेंगे भी और जितेंगे भी..' ; ज्योती मेटेंचा निर्धार!

या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ निराश आणि हतबल झालेला काँगेस पक्ष याला विरोध करत आहे, असे अजयसिंह यांनी सांगितले. आमच्या मागणीवरून राज्य सरकारने फलटण शहरातील पुतळ्यानच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. आम्ही जी कामे करतो त्याचेच श्रेय घेत असतो. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ राजे गटाकडे सर्व सत्तास्थाने असून त्यांना त्यांचे कार्यकाळात का पुतळ्यांचे सुशोभिकरण करता आले नाही ? तुम्हाला कोणी रोखले होते, असा सवाल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विचारला.

ज्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आजपर्यंत एक रुपया देखील निधी दिलेला नाही, त्यांनी यावर बोलू नये. फलटण तालुक्यात आम्ही कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली असून शहरातील सर्व रस्त्यासाठी लवकरच मोठा निधी मिळणार आहे. फलटण प्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात सुद्धा मोठा निधी दिला असल्याचे असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

(Edited By - Chaitanya Machale)

Ajay Mishra
Vidarbh Protest : वेगळ्या विदर्भासाठीच्या बेमुदत आंदोलनाकडे प्रशासनाची पाठ, पदाधिकाऱ्यांची प्रकृती खालावली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com