Beed News : 'लढेंगे भी और जितेंगे भी असा नारा' दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी दिला. तसेच 'चालायला आता सुरुवात केली आता माघार नाही.' शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी हे वक्तव्य केले असले, तरी विनायकराव मेटे यांचे स्वप्न पूर्ण करणारा हा मुद्दा अधोरेखित करताना त्यांनी केलेले हे वक्तव्य भविष्यातील बदलत्या राजकीय समिकरणाची नांदी ठरू शकते. असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे(Vinayak Mete) यांनी आपल्या सामाजिक वाटचालीत व्यसनमुक्तीसाठी काम केले. सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी करताना तरुण दारु पितात व नंतर याच व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे या दिवशी तरुणांना गोड व सुगंधी दुध पाजून त्यांच्यासाठी ते सांस्कृतिक कार्यक्रम व व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता विनायक मेटेंच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीही मागच्या वर्षीपासून हा उपक्रम सुरुच ठेवला आहे. या निमित्त शनिवारी व्यसनमुक्ती फेरी निघाली. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डॉ. ज्योती मेटे(Jyoti Mete), जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे, भारत श्री स्नेहा कोकने यांच्या उपस्थितीत फेरीची सुरुवात झाली.
समारेपाला आयुष्यमान भारत योजनेच्या महाराष्ट्र समितीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, शिवसंग्रामचे प्रदेशध्यक्ष तानाजीराव शिंदे, स्नेहा कोकने, नारायण गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, बंकटस्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे, नवनाथ महाराज, मौलाना मुक्ती अब्दुल, मौलाना जफर काजी, ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे, भाजप(BJP) किसान सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसंग्रामचे नारायण काशिद, नितीन कोटेचा, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफिक, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, स्वप्निल गलधर, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) परमेश्वर सातपुते, अशुतोष मेटे आदींची उपस्थिती होती.
शहरातून निघालेल्या फेरीत मद्यपान संसाराची धुळधाण, व्यसनाची गोडी अन् संसाराची राखरांगोळी, घ्याल तंबाखुची साथ, आयुष्य होईल बरबाद, अशा विविध घोषणांनी शहर दणानून निघाले. नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचा फेरीत सहभाग होता.
समारोपावेळी भाषणात डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, 'मराठा आरक्षण आणि शिवस्मारक या मुद्द्यावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही. मेटे जिथे असतील तिथे त्यांनी निश्चिंत असावे, आता चालायला सुरुवात केली आहे, आता माघार नाही. काहीही करा पण आपले ध्येय साध्य करायचे हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.' दरम्यान, त्यांच्या भाषणातील मुद्दे भविष्यात नव्या राजकीय समिकरणाची नांदी ठरू शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांचे निकटवर्ती असलेले ओमप्रमाश शेटे म्हणाले, 'व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेणारे एकमेव दिवंगत विनायक मेटे होते, त्यांचा वसा डॉ. ज्योती मेटे समर्थपणे चालवत अससल्याचे सांगून या कार्यक्रमासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांचे प्रतिनिधी महणून आलो आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या बहिणीसाठी ओवाळनी दिल्याशिवाय राहणार नाहीत.' हे वक्तव्यही सूचक होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.