Narendra Modi News : 'गद्दारांना सोबत घेऊन मोदी सरकारने महाराष्ट्राची लूट चालवली' ; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात !

Narendra Modi Maharashtra Tour : "केंद्र सरकारने मणिपूर राज्य जळत असतानाही काही केले नाही.."
Narendra Modi Maharashtra Tour :
Narendra Modi Maharashtra Tour :Sarkarnama
Published on
Updated on

Karhad News : केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी गद्दारांना हाताशी धरून सत्तेतून राजकारण आणि अर्थकारणाचा कुटील डाव साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांनीच आपल्या राज्याची लूट चालवलेली आहे. ही लूट आपणच थांबवली पाहिजे, येत्या निवडणुकीत तुम्हीच त्यांना धडा शिकवा, असे जनतेला आवाहन माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कासारशिरंबे येथील विकासकामांचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. (Latest Marathi News)

Narendra Modi Maharashtra Tour :
Akola Politics News : वंचित, राष्ट्रवादी, भाजप असा प्रवास करून माजी आमदार भदे आता शिवसेनेत जाणार !

चव्हाण म्हणाले, "राज्यांचे जीएसटीचे पैसे जमा करून तेच पैसे जनतेला परत देऊन, त्याचा नाहक गाजावाजा केला जात आहे. याकडे जनतेने गंभीरतेने पाहिले पाहिजे. अनेक गोष्टी तोट्यात गेल्या आहेत. आपल्या राज्याचे साक्षरतेचे प्रमाण ८३ टक्के पर्यंत पोहचले आहे. साक्षरतेमध्ये आपण केरळच्या प्रमाणापर्यंत जायला आता वेळ लागणार नाही, पण त्यासाठी सकारत्मक दृष्टी हवी. पण ती सत्ताधाऱ्यांकडे नाही."

Narendra Modi Maharashtra Tour :
Gulabrao Patil Passed Away: जनता दलाचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

"विकासकामांमध्ये टक्केवारी व बदल्यांमध्ये पैसे खाणारी लोकं राज्याचा विकास काय करणार? काम करणाऱ्या अनेक सरकारी यंत्रणांचा दबाव आहे. नुसती योजनांची नावे बदलली जात आहेत. कलमे बदलली जात आहेत. राज्यांकडे स्वायत्ता बहाल केल्याची नुसतीच वल्गना करणाऱ्या केंद्र सरकारने मणिपूर राज्य जळत असतानाही काही केले नाही, हे फार दुर्दैवाचं आहे," असेही चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com