Gulabrao Patil Passed Away: जनता दलाचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

Former MLA Gulabrao Patil Death News: अखेरच्या टप्य्यात गुलाबरावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama

Amalner Political News: समाजवादी विचारसरणीचे नेते, अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय ९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

आज (बुधवार) दुपारी दोन वाजता त्यांच्या मुळगावी दहिवद (ता.अमळनेर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Gulabrao Patil
Narendra Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्येप्रकरणी 'ही' मोठी अपडेट; तपास पूर्ण अन् लवकरच सीबीआय...

गुलाबराव पाटील हे तीन वेळा जनता दलाचे आमदार म्हणून निवडून आले होते. आपल्या राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्य्यात गुलाबरावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Gulabrao Patil
Injustice to Sangram Thopte : आमदार संग्राम थोपटेंवर आमच्याकडून अन्याय झाल्यासारखं वाटतंय; काँग्रेस नेत्याची कबुली

समाजवादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत अहिराणी भाषेतून शपथ घेणारे ते पहिले आमदार होते. खानदेशाची मुलुख मैदान तोफ म्हणून त्यांची ओळख होती.

धुळे जिल्हा परिषदेतील भास्कर वाघ गैरव्यवहार प्रकरण, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले होते. मंत्रालयावर शेतकऱ्यांसाठी त्यांनी शिंगाडे मोर्चा काढला होता. अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे ते आजोबा होत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com