Pune News : पुणे मेट्रो टप्पा क्रमांक दोनचे उद्घाटन आज (ता. १ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच मोदी यांनी सहकार मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना बोलावून घेत पाच मिनिटे चर्चा केली. विशेष म्हणजे व्यासपीठावर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते. (Narendra Modi's discussion with Dilip walse Patil on the platform itself)
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रोच्या टप्पा क्रमांक दोनचे लोकार्पण आज झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर भाषणे सुरू झाली. निवेदकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव भाषणासाठी पुकारले. शिंदे हे उठून उपस्थितांची नावे घेत होते, तेवढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना खुनेने बोलावून घेतले. इकडे मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होते आणि व्यासपीठावर मोदी हे वळसे पाटील यांच्याशी चर्चा करत होते.
मोदी आणि वळसे पाटील यांच्यात व्यासपीठावरच पाच मिनिटे चर्चा सुरू होती. मोदी यांनी वळसे पाटील यांच्याशी काय चर्चा केली, याची उत्सुकता पुणेकरांनी लागून राहिली आहे. कारण मोदींचा थेट वळसे पाटील यांच्याशी तसा संबंध आतापर्यंत कमीच आलेला आहे. तरीही मोदी हे वळसे पाटील यांच्याशी एवढ्या गंभीरपणे कशावर चर्चा करत असावेत, याची कुजबूज कार्यक्रमस्थळी रंगली होती.
वळसे पाटील हे अजित पवार यांच्याबरेाबर भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे वळसे पाटील यांच्यासोबतच्या पंतप्रधानांच्या चर्चेचे पुणेकरांना आश्चर्य आहे. पाच मिनिटांनी मोदी यांच्यासोबतची चर्चा संपवून वळसे पाटील हे आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यावेळी त्यांची अजित पवार यांच्यासोबतही चर्चा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.