Rohit Patil New
Rohit Patil NewSarkarnama

Rohit Patil New: माझ्यावर गुन्हा दाखल करा; रोहित पाटील आक्रमक; पोलिस ठाण्यातच ठिय्या

Sangli Drought News: पोलिसांच्याकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटलांनी विरोध केला. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करा, अशी ठाम भूमिका घेतली.

Sangli, 26 May: राज्यात दुष्काळ परिस्थिती अधिक गडद बनली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सांगली (Sangli)परिसरातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil)यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी बिरणवाडी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि रोहित पाटील यांच्यात बाचाबाची झाली.

Rohit Patil New
Pune News: पुणेरी बिबट्यांना मिळणार गुजराती 'पाहुणचार': खासदार कोल्हे म्हणाले, "काही फरक पडणार नाही..."

रोहित पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांच्याकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटलांनी विरोध केला. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करा, अशी ठाम भूमिका रोहित पाटलांनी पोलिस ठाण्यातच घेतली. सावळजसह परिसरातील शेतकऱ्यांनी पुणदी सिंचन योजनेतून पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करीत होते. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पाटील थेट पोलीस ठाण्यातच गेले, यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दीक वाद झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. तीन ते चार किलो मीटर दूरवरून गावातील लहान मुले, महिला पाण्यासाठी कडक उन्हात पायपीट करीत आहेत. चार किलो मीटर दूर असलेल्या या विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाझर यालाव आणि विहीर पूर्णतः अटल्या आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आदेश दिले असले तरी अद्याप सांगली जिल्हा प्रशासन या गावापर्यंत पोहचले नाही. शासनाने पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com