Pune News: पुणेरी बिबट्यांना मिळणार गुजराती 'पाहुणचार': खासदार कोल्हे म्हणाले, "काही फरक पडणार नाही..."

Central Zoo Jamnagar : लवकरात लवकर बिबट प्रजनन नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात व बिबट प्रवण क्षेत्र हे राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करावे, अशी आमची मागणी आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
Central Zoo Jamnagar
Central Zoo Jamnagar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये उद्योगधंदे गुजरातला (Gujarat) पळवले जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. तर आता त्यांच्यात मतदारसंघातील शंभर बिबटे (Lepoard) गुजरातला घेऊन जाणार असल्याचं समोर आल्यानंतर या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी समाज माध्यमांवरती याबाबतची माहिती देणारी पोस्ट टाकली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, "महाराष्ट्र शासनाने अधिक दिरंगाई न करता बिबट प्रवण क्षेत्र हे राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करावे व बिबट प्रजनन नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी आमची मागणे आहे. जुन्नर वन उपविभागातील १०० बिबटे गुजरातला नेणार अशी माहिती मिळाली. मानव-बिबट संघर्षावर केलेला हा उपाय स्वागतार्ह असला तरी अगदीच तात्पुरता आहे. या भागांमध्ये 700 हुन अधिक बिबटे असताना फक्त 100 बिबटे हलवल्याने परिस्थितीमध्ये फारसा काही फरक पडणार नाही,"

Central Zoo Jamnagar
Vijay Wadettiwar News: मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला! डॉ. पवारांच्या 'लेटर बॅाम्ब'नंतर वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

बिबट्यांच्या प्रजननाचा वेग पाहता काही बिबटे गुजरातला हलवून आज कमी होणारी संख्या भविष्यात कधीतरी वाढणारच आहे. बिबट प्रजनन नियंत्रण व राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करणे हाच या समस्येवर शाश्वत उपाय आहे. याबाबतीत मी स्वतः अनेकदा संसदेत भूमिका मांडली आहे, केंद्रीय वन मंत्री, केंद्रीय वन महासंचालक यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली आहे, त्यांच्या सूचनेनुसार काही महिन्यांपूर्वी जुन्नर वन उपविभागाने महाराष्ट्र सरकारकडे बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्तावही सादर केला आहे.

महाराष्ट्र सराकारच्या दिरंगाईमुळे जुन्नर वन उपविभागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मानव-बिबट संघर्ष तीव्र होत आहे. माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सदर बाबीचा गांभीर्याने विचार करत लवकरात लवकर बिबट प्रजनन नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात व बिबट प्रवण क्षेत्र हे राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करावे, अशी आमची मागणी आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यासाठीची केंद्र सरकारची परवानगीही मिळालीय, त्यामुळे आता जुन्नरचे बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाहुणे म्हणून जाणार आहेत. जुन्नर वनविभागातील खेड,आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात मानव आणि बिबट्यांचा संघर्ष वाढलाय. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com