Satara : राष्ट्रवादी 'युवक'ने केले कोश्यारींना बाय बाय...

Bhagatsinh Koshyari राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी फुग्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रतिमा बांधून ती सोडून दिली. तसेच कोश्यारी बाय बाय.. अशी घोषणा दिली.
NCP Youths Andolan
NCP Youths Andolan Pramod Ingale, Satara
Published on
Updated on

Satara News : कोश्यारी बाय बाय, अशी घोषणबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज पोवईनाक्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याबद्दल आंनदोत्सव साजरा करत नागरीकांना पेढे वाटप केले. यावेळी फुग्यांना भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिमा बांधून ते फुगे सोडण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत करत कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

साताऱ्यात राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी फुग्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रतिमा बांधून ती सोडून दिली. तसेच कोश्यारी बाय बाय.. अशी घोषणा दिली. तसेच कोश्यारी यांचा राजीनामा मान्य झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पोवई नाका येथे नागरिकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवाचे नेते तेजस शिंदे,

NCP Youths Andolan
Satara : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कायम राखणार... श्रीनिवास पाटील

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, विद्यार्थी काँग्रेसचे अतुल शिंदे, महिला आघाडीच्या समिंद्रा जाधव, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रमेश उबाले, शफीक शेख, मंगेश ढाणे, प्रतिक कदम, आतिष कदम, सागर पवार, विकास अवघडे ,महेश जाधव, प्रथमेश पवार, आकाश जाधव तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Youths Andolan
Koregaon : कोरेगावच्या लोकप्रतिनिधींचे खोक्याला प्राधान्य...शशिकांत शिंदे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com