Gokul Dairy news : पहिल्याच मासिक बैठकीत अध्यक्षांचा गोकुळच्या ऐशोराम व्यवस्थेला दणका, 'ती' आलिशान गाडी विकणार

Navid Musrif targets Gokul Dairy’s luxury expenses in first meeting; plans to sell costly official vehicle : गेल्या महिन्याभरात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरुन जिल्ह्यात राजकीय घमासान झाले. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे अध्यक्ष झाले.
Hasan Mushrif explains his stance on appointing Navid as Gokul Dairy chairman, calling it an act of compulsion due to political pressure.
Hasan Mushrif explains his stance on appointing Navid as Gokul Dairy chairman, calling it an act of compulsion due to political pressure. sarkarnama
Published on
Updated on

Gokul chairman action : गेल्या महिन्याभरात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरुन जिल्ह्यात राजकीय घमासान झाले. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे अध्यक्ष झाले.

अध्यक्ष होताच नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षांना वापरण्यात येणारी गाडी आपण वापरणार नसल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर पूर्वी सर्व संचालकांना देण्यात आलेल्या स्कार्पिओ गाड्यांची चर्चा चांगलीच रंगली होती. नंतर मुश्रीफ यांनी केलेली घोषणा याचीही चर्चा गोकुळच्या राजकारणात उमटली. पण गोकुळचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी पहिल्याच मासिक बैठकीत धडाकेबाज निर्णय घेत थेट गोकुळच्या ऐषाराम व्यवस्थेलाच फाटा दिला आहे.

नवीद मुश्रीफ अध्यक्ष झाल्यानंतर पहिलीच मासिक बैठक काल पार पडली. या मासिक बैठकीत अध्यक्षांची मोटार विक्री करण्याचा निर्णय नूतन अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी घेतला. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतल्याने याची चांगलीच चर्चा होती. (kolhapur news)

नविद मुश्रीफ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गोकुळ अध्यक्षपदासाठी असलेली मोटार वापरणार नाही, अशी घोषणा केली होती. निवडीनंतर आज संचालकांची मासिक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी अध्यक्षांसाठी असलेली महागडी मोटार विक्री करण्याचा निर्णय घेतला. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून तिची विक्री करावी, असा ठराव आजच्या बैठकीत झाला. माझ्याकडे स्वतःची मोटार असताना मी ‘गोकुळ’ची मोटार वापरणे योग्य वाटले नाही. त्यामुळे हा निर्णय मी घेतला आहे. निविदा प्रक्रियेनुसार मोटारीची विक्री होईल. नुकतीच आम्ही मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Hasan Mushrif explains his stance on appointing Navid as Gokul Dairy chairman, calling it an act of compulsion due to political pressure.
Satej Patil Emotional : जिल्ह्यावर सत्ता गाजविणारे सतेज पाटीलांची भावनिक साद, म्हणाले, 'आता मी एकटाच...'

मागील काही वर्षात गोकुळच्या संचालकांना गाड्या देण्यात आल्या होत्या. मात्र पाटील आणि मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या संचालक मंडळाने त्या गाड्या वापरण्यास नकार दिला होता. नंतर अध्यक्षांनीही गोकुळ संघाची गाडी नाकारल्यानंतर त्याचीही चर्चा गोकुळच्या राजकारणात सकारात्मक पद्धतीने उमटली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com