Sangram Jagtap : नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आमदार संग्राम जगतापांच्या कानपिचक्या; रोख नेमका कोणाकडे ?

Nagar Politics : राजकारणात श्रद्धा आणि सबुरी ठेवून काम केल्यास नागरिकांचा विश्वास संपादन होत असतो.
Sangram Jagtap
Sangram JagtapSarkarnama

Nagar : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहर संघटनेवर लक्ष केंद्रित केले आहे. नगर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन आणि कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. आमदार जगताप यांनी या वेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. या कानपिचक्यांचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा सध्या नगरच्या राजकारणात रंगली आहे.

आमदार जगताप म्हणाले, "आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना विचार मांडण्यासाठी समाजमाध्यम मिळाले आहे. मात्र, काही जण याचा दुरुपयोग करीत दुसऱ्यावर आरोप करून आपली दुकानदारी चालवत असतात. युवकांनी आपली वैचारिक पातळी सोडू नये. राजकारणाची दिशा समजून काम करावे. राजकारणात श्रद्धा आणि सबुरी ठेवून काम केल्यास नागरिकांचा विश्वास संपादन होत असतो. पदाला आपल्या कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम नवनिर्वाचित युवक पदाधिकाऱ्यांनी करावे." समाजमाध्यमांचा वापर युवकांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी करावा, असेही आवाहन आमदारांनी केले.

Sangram Jagtap
Jitendra Awad : 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही; आव्हाडांनी अजितदादांना सुनावलं...

नगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी गौरव हरबा, उपाध्यक्ष सागर विधाते, सचिव दीपक गोरे, सहसचिव अभिजित साठे यांना नियुक्ती पत्र देऊन या वेळी सत्कार करण्यात आला. नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी युवकांनी समाजामध्ये वावरत असताना भान ठेवून काम करावे, असा सल्ला दिला. पदाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण होत असते. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या युवकांना नक्कीच संधी मिळते, असेही भागानगरे म्हणाले. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर यांनी युवकांना पक्षांमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी देत आहोत, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com