Gadhinglaj : राष्ट्रवादीचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी ( दि.१०) बैठक झाली. यावेळी गडहिंग्लज राष्ट्रवादी अजित पवार अन् आमदार राजेश पाटलांच्या पाठीशी असल्याचं समोर आलं आहे.
आमदार राजेश पाटील(Rajesh Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. विकासासाठी राजेश पाटील यांनी साथ दिली आहे. आम्ही त्यांच्यासोबत काल होतो, आज आहोत आणि भविष्यातही सोबत राहू असा निर्धार गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राजेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आमदार पाटील म्हणाले, चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. वर्षभरात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंजूर कामांना निधी मिळणे मुश्किल झाले होते. निधी अजित पवारच उपलब्ध करुन देतील. सोबत मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्या माध्यमातूनही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध होण्याची खात्री आहे. आजही शरद पवार यांना माझ्या हृदयात स्थान आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करावे.
या बैठकीत रामाप्पा करिगार, जयकुमार मुन्नोळी, महाबळेश्वर चौगुले, गंगाधर व्हसकोटी, जयसिंग चव्हाण, राजेश पाटील-औरनाळकर, दशरथ कुपेकर, मुन्नासाहेब नाईकवाडी, रघुनाथ पाटील, बंडू मोरबाळे, सदाशिव सावंत, अनिकेत कोणकेरी, आप्पासाहेब गडकरी, जितेंद्र रेडेकर, शुक्राचार्य चोथे, जब्बार मुल्ला यांची भाषणे झाली. बाबासाहेब पाटील-मुगळीकर, संतोष पाटील, भरत पाटील, अभिजीत पाटील, प्रकाश पाटील, बाबुराव चौगुले, दीपक पुजारी, प्रवीण शिंदे, प्रताप पाटील, एस. एन. देसाई, रोहिदास चौगुले, एम. के. कोकितकर, पी. के. पाटील, दयानंद नाईक आदी उपस्थित होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.